नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपली कोरोना तपासणी करणार आहेत. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी हा निर्णय भाजप खासदार दुष्यंत सिंह यांच्या भेटीनंतर घेतला आहे. दुष्यंत सिंह बॉलिवूडची गायिका कनिका कपूर हिने दिलेल्या पार्टित सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. राष्ट्रपती भवनातर्फे जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात सांगण्यात आलं आहे की, 'कोरोनाबाबत सरकारने जारी केलेल्या सर्व सुचनांचं पालन राष्ट्रपतीदेखील करणार आहेत.'
राष्ट्रपतींनी सरकारच्या पुढिल आदेशापर्यंत आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यादरम्यान, दुष्यंत सिंह यांच्यासोबत कोणत्या ना कोणत्या कारणाने संपर्कात आलेले लोकही स्वतःला कोरंटाइन करत आहेत. दरम्यान, भाजपचे खासदार दुष्यंत सिंह आपली आई आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्यासह रविवारी लखनऊमध्ये कनिका कपूरच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अशातच कनिका कपूरला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कनिका ज्या लोकांना भेटली होती, किंवा ज्यांच्या संपर्कात होती, त्यांची चौकशी करून तपासणी सुरू आहे.
उत्तरप्रदेश सरकारने घोषणा केली आहे की, 'कनिका कपूरविरोधात संवेदनशील माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. कनिकाने ज्या ठिकाणी ही पार्टी ठेवली होती. त्या ताज हॉटेलला बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचंही मेडिकल चेकअप करण्यात येणार आहे.
पाहा व्हिडीओ : Kanika Kapoor | कनिका कपूरमुळे कोरोना संसदेत पोहोचला?
कनिका कपूरला कोरोनाची लागण
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी ती लंडनवरून परतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरने कोरोनाची लागण झाल्याची गोष्टी लपवून ठेवली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती, एवढचं नाहीतर तिने डिनर पार्टीही ठेवली होती.
संबंधित बातम्या :
Coronavirus | बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण
Coronavirus | कनिका कपूरविरोधातील एफआयआरमधून माहिती उघड; 14 मार्चलाच कोरोना झाल्याचं स्पष्ट