नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी ती लंडनवरून परतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरने कोरोनाची लागण झाल्याची गोष्टी लपवून ठेवली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती, एवढचं नाहीतर तिने डिनर पार्टीही ठेवली होती.



कनिका कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोसेट केली असून तिने त्यामध्ये आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचंही स्पष्ट केलं आहे. कनिका कपूर म्हणजे, बॉलिवूडमधील एक नामांकित नाव आहे. कनिकाने 'बेबी डॉल मैं सोने दी' हे प्रसिद्ध गाणं गायलं आहे. याव्यतिरिक्त काही रिअॅलिटि शोमध्ये कनिका जज देखील होती.


भारत सरकार अटोनाट प्रयत्न करत असूनही देशातील रूग्णांची संख्या वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून अनेक उपाययोजनाही लागू करण्यात येत आहेत. आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 195वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 163 भारतीय असून 32 विदेशी नागरिक आहेत.


बॉलिवूड सेलिब्रिटी या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी जनजागृती करताना दिसत आहेत. अनेकांनी स्वतःला आयसोलेट करून ठेवलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरही काही दिवसांपूर्वी आपल्या पतीसोबत लंडनहून भारतात परतली आहे. तिनेही स्वतःला घरातच आयसोलेट केलं आहे. 


दरम्यान, 97 वर्षीय अभिनेता दिलीप कुमार यांनीही स्वतःला आयसोलेट केलं आहे. त्याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्वीट करत सांगितले की, 'सायरा त्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना पूर्णपणे आयसोलेशनवर ठेवण्यात आलं आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या फॅन्सलाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गरज नसताना घराबाहेर पडणं टाळा आणि आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घ्या, तसेच आरोग्य विभागाने जारी केलेल्या सर्व सुचनांचं पालन करण्याचंही आवाहन दिलीप कुमार यांनी केलं आहे.


संबंधित बातम्या :


Coronavirus | दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये तर हॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोनाच्या कचाट्यात


Coronavirus | हॉलिवूडमधील 'हे' सेलिब्रिटींना कोरोना बाधित


#Coronavirus कोरोनाबाबत जनजागृती करणारे फिल्मी बॅनर्स पाहिलेत का?