नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरनंतर मोठी खुलासा झाला आहे. एफआयआरनुसार, 14 मार्च रोजी विमानतळावरच कनिका कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं होतं. पोलीस कमिश्नर सुजीत पांडे यांनी सांगितलं की, 11 मार्चलाच कनिका कपूर लंडनहून लखनऊला परतली होती. परदेशवारी करून आलेल्या कनिकाला कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तरिही लंडहून परतल्यानंतर तिने उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊसह अनेक ठिकाणी पार्ट्यांना हजेरी लावली. सध्या कनिका कपूरविरोधात लखनऊच्या गोमती नगर, हजरतगंज नगर आणि सरोजनी नगरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहेत.


Coronavirus | बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण


पुढिल आदेशापर्यंत लखनऊमधील ताज हॉटेल बंद


लखनऊमध्ये 11 मार्चपासून 17 मार्चपर्यंत कनिकाने तीन पार्ट्यांना हजेरी लावली होती. यामध्ये एका पार्टित उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंहदेखील सहभागी झाले होते. 15 मार्च रोजी झालेल्या पार्टिमध्ये भाजपचे खासदार दुष्यंत सिंह आणि राजस्थानमधील माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी कनिका लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये थांबली होती. सरकारच्या पुढिल आदेशापर्यंत ताज हॉटेल बंद करण्यात आलं आहे.


पाहा व्हिडीओ :  Kanika Kapoor | कनिका कपूरमुळे कोरोना संसदेत पोहोचला?



कानपूरमधील कल्पना अपार्टमेंट करण्यात आलं सॅनिटाइज


गायिका कनिका कपूर 12 आणि 13 मार्च रोजी कानपूरमध्ये थांबली होती. त्यावेळी कानपूरमध्ये एका पार्टितही तिने हजेरी लावली होती. याव्यतिरिक्त आपला मामा विपुल टंडन याच्या गृहप्रवेशासाठीही कनिकाने हजेरी लावली होती. या गोष्टिंचा खुलासा झाल्यानंतर आरोग्य विभागाने कल्पना टॉवर सॅनिटाइज केला आहे. तसेच कनिका कपूरच्या नातेवाईकांचीही तपासणी करण्यात आली आहे.


प्रशासनाकडून सदर प्रकरणी चौकशीचे आदेश


कनिका कपूर जेव्हा लंडनहून भारतात आली त्यावेळी ब्रिटनमध्ये कोरोनाचे 278 रूग्ण आढळून आले होते. तरिही कनिका कपूरने स्वतःची तपासणी करण्याऐवजी पार्ट्यांमध्ये हजेरी लावली. कनिका कपूरच्या पार्टिमध्ये कोणी हजेरी लावली होती? कुठे-कुठे पार्ट्या करण्यात आल्या? किती लोकांच्या संपर्कात आली? याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


संबंधित बातम्या :


Coronavirus | दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये तर हॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोनाच्या कचाट्यात

Coronavirus | हॉलिवूडमधील 'हे' सेलिब्रिटींना कोरोना बाधित


#Coronavirus कोरोनाबाबत जनजागृती करणारे फिल्मी बॅनर्स पाहिलेत का?