नवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी येताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या आत आल्याने काहीसा दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासात देशात 92 हजार 596 नवीन रुग्णांची भर पडली असून 2219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एकाच दिवसात देशातील एक लाख 62 हजार 664 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, म्हणजे एकाच दिवसात 72,287 सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी भारतात 86,498 रुग्णांची भर पडली होती. 


देशात गेल्या 27 दिवसांपासून सलग कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. देशातील रिकव्हरी रेट हा 94 टक्के इतका आहे तर मृत्यू दर हा 1.21 टक्के इतका आहे. मंगळवारपर्यंत देशात 23 कोटी 90 लाख 58 हजार कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. 


देशातील आजची एकूण कोरोना आकडेवारी 



  • एकूण कोरोना रुग्ण - दोन कोटी 90 लाख 89 हजार 

  • कोरोना मुक्त झालेले रुग्ण - दोन कोटी 75 लाख 4 हजार 126

  • एकूण सक्रिय रुग्ण - 12 लाख 31 हजार 415 

  • एकूण मृत्यू - 3 लाख 53 हजार 528


राज्यातील स्थिती
राज्यात मंगळवारी गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. काल राज्यात 10 हजार 891 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात 16,577 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 55,80,925 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.3 टक्के एवढे झाले आहे. दरम्यान आज 295 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के इतका आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,69,07,181 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,52,891 (15.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11,53,147 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर 6,225 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,67,927 सक्रिय रुग्ण आहेत.


महत्वाच्या बातम्या :