नवी दिल्ली : इन्फोसिस कंपनीकडून अर्थ मंत्रालयाच्या नव्या टॅक्स ई-फायलिंग वेब साईटचे लॉन्चिंग करण्यात आलं होतं. पण लॉन्चिंग झाल्यानंतर काही वेळेतच या वेबसाईटमध्ये समस्या निर्माण झाल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही वेब साईट विकसित करणारी कंपनी इन्फोसिस आणि त्याचे सह-संस्थापक नंदन निलकेणी यांना लवकरात लवकर ही समस्या सोडवावी असा आदेश दिला. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "या वेब साईटवरुन अनेक यूजर्सनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे यापुढे करदात्यांना देण्यात येणारी सुविधा प्रभावित होऊ नये. ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 8.45 वाजता लॉन्च केलं होतं. यात निर्माण झालेल्या समस्यांमध्ये इन्फोसिस आणि नंदन निलकेणी यांनी लक्ष घालावं आणि करदात्यांना गुणवत्तापूर्वत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. करदात्यांना सुलभता देणं ही आपली प्राथमिकता असायला हवी."


 










केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या या आदेशाला उत्तर देताना नंदन निलकेणी यांनी खेद व्यक्त केला आणि ही वेबसाईट लवकरच सुरळीत होईल असा विश्वास दिला. त्या आधी सहा दिवस ही वेव साईट बंद करण्यात आली होती. 


 


महत्वाच्या बातम्या :