एक्स्प्लोर
Coronavirus | कर्नाटकातून आंतरराज्य बससेवा बंद, बेळगावमधून महाराष्ट्र, गोवा प्रवासी वाहतूक थांबवली
बस सेवा बंद झाल्यामुळे सीमावर्ती भागात उद्योग व्यवसाया निमित्त येणाऱ्या जाणाऱ्यांची पंचाईत होणार आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, चंदगड, गडहिंग्लज आणि महाराष्ट्रातील अन्य गावातून कर्नाटकात येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
बेळगाव : बेळगावहून महाराष्ट्र आणि गोव्याला जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस ,मॅक्सी कॅब, खासगी बस यांची वाहतूक 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ एस.बी.बोमनहळ्ळी यांनी दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आंतरराज्य प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.या बैठकीत आंतरराज्य बस सेवा,मॅक्सी कॅब,अन्य प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र,गोव्यातून येणारी आणि जाणारी प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख,प्रादेशिक परिवहन अधिकारी,राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दररोज बेळगावहून गोवा आणि महाराष्ट्रात बस जातात.या बसमधून हजारो प्रवासी नित्य प्रवास करतात.पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महाराष्ट्र आणि गोव्याची बससेवा स्थगित करण्यात आली आहे. बस सेवा बंद झाल्यामुळे सीमावर्ती भागात उद्योग व्यवसाया निमित्त येणाऱ्या जाणाऱ्यांची पंचाईत होणार आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, चंदगड, गडहिंग्लज आणि महाराष्ट्रातील अन्य गावातून कर्नाटकात येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 31 मार्च पर्यंत 144 कलम प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आला आहे.
गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट थांबवा
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट तत्काळ थांबविण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक नागरिक हे आपापल्या गावी जात आहेत. अशा गंभीर प्रसंगी आपल्या कुटुंबियांसोबत असावे असे प्रत्येकालाच वाटते व त्यामुळे ते गावी उपलब्ध वाहतूक साधनाने जात आहेत. राज्य शासनाच्या बसेस सोबत नागरिक खाजगी वाहनेही वापरत आहेत आणि ह्याच गोष्टीचा गैरफायदा खाजगी वाहन व्यावसायिक घेत आहेत.
पुणे-नागपूर अथवा पुणे-लातूर व इतर बसेसचा दर ह्या व्यावसायिकांनी वाढवलेला आहे. दर वाढविल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी परिवहन आयुक्त श्री शेखर चन्ने यांना अशा व्यावसायिकांवर तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त शेखर चन्ने यांनी संबंधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना दिल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement