कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरत चाललाय. पण भारताची लोकसंख्या पाहता अद्याप तरी अमेरिका इटलीच्या तुलनेत भारतात कोरोनाचा कमी प्रसार आहे. त्यामुळे जगातल्या माध्यमात भारताविषयी अनेक चर्चा सुरु आहेत. जगातल्या माध्यमात भारतात का कोरोनाचा प्रादुर्भाव कमी का आहे त्याची तीन कारण चर्चेत आहेत. त्यात बीसीजी, हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि तापमान ही महत्वाची कारणं आहेत.
भारतात ज्यांना लक्षणे आहेत अशांची तपासणी केली तर 3 टक्के खाजगी लॅबमधली फक्त 0.2 टक्के पाॅझिटिव्ह आढळून आलेत. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशात इतर देशांच्या तुलनेत कमी प्रसार आहे. त्याची कारणं काही विश्लेषकांना कोरोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत का असं वाटत आहे. हे जाणून घेण्यासाठी जगातले तज्ञ जागतिक पातळीवर ओपन सोर्स वेबसाइट नेक्स्टस्टाईनवर जावून शोध घेताहेत. ही वेबसाईट जगातल्या विषाणूच्या संदर्भातली अधिकत माहितीचं स्त्रोत आहे.
वेबसाईटच्या संशोधन आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कोरोनाव्हायरसचे 8 ते 18 वेगवेगळे प्रकार आहेत. पण हे वेगवेगळे विषाणू नाहीत तर शास्त्रीय भाषेत त्याला म्युटेशन म्हणतात. म्हणजे किंचीत बदल आहेत.
चीनमधून आलेल्यापेक्षा किंचीत वेगळे असले तरी ते कमी किंवा अधिक घातक नाहीत. आजवरच्या संशोधनात कोरोना हे चीनचे अस्त्र नाही हे ही सिध्द झाले आहे. तरीही जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आणि भारतातला कोरोना विषाणू वेगळा आहे का? असा प्रश्न तामिळनाडू सरकारला पडलाय. तबलीकीशी संबंधीत असलेल्या बहुतेक बाधित पेशंटमध्ये कोरोनाची लक्षणचं आढळून आलेली नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या ह्या अवताराबद्दल संशोधन व्हावा अशी मागणी तामिळनाडू सरकारने केंद्राकडे केली आहे. पुण्याच्या एनआयव्हीने असा अभ्यास केला आहे.
पुण्याच्या एनआयव्हीने 881 पेशंटचे सॅंपल तपासल्यावर ह्या अभ्यासाच्या नोंदी इंडीयन मेडिकल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. 25 फेब्रुवारीला तयार झालेला एक अहवाल आहे. चीनच्या वुहानशी तुलना करता 99.99 टक्के साम्य आहे. पण भारतात एकाच विषाणूत दोन सूक्ष्म बदल आहेत.
‘स्ट्रेन’ हा व्हायरसचा एक उप-प्रकार आहे, जो पेशींच्या वेगवेगळ्या पृष्ठभागावरील प्रथिने वरून ओळखतां येतो. एखादा विषाणू खूप वेगाने बदल करत आसेल तर उपचारासाठी तयार झालेल्या लस निरुपयोगी ठरतात. सध्या कोरोनामध्ये जे बदल होत आहेत तो स्ट्रेन नाही पण कोरोनातले सूक्ष्म बदलामुळे सुध्दा जगभरात एकच एक लस वापरणे शक्य होईल का? या विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.