या घटनांवरुन चिढलेल्या अजय देवगणने आपली नाराजी व्यक्त करत एक ट्वीट केलं आहे. त्यात अजय देवगण म्हणतो, 'अशा बातम्या पाहून मी निराश झालो आहे. मला खूप राग येतो आहे. शिकलेले लोक निराधार अंदाज लावत जर डॉक्टरांवर हल्ले करत असतील तर ते लोक असंवेदनशील आहेत. असे लोक सर्वात वाईट गुन्हेगार आहेत.'
यावेळी अजय देवगणने लोकांना घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. लॉकडाऊनच्या या काळात बॉलीवूड सेलिब्रिंटींनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वत:ला क्वॉरन्टाईन करुन घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अजय देवगणची पत्नी काजोल मुलगी न्यासाला कोरोना झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजय देवगणने या सर्व चर्चांचं खंडण केलं होतं. माझी पत्नी काजोल आणि मुलगी न्यासा यांची प्रकृती उत्तम असल्याचा खुलासा अजय देवगणने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. ‘विचारल्याबद्दल धन्यवाद. काजोल आणि न्यासा एकदम ठीक आहे. त्याच्या तब्येतीच्या सर्व अफवा खोट्या आहेत’ अशा प्रकारचं ट्वीट अजयने केलं होतं.
Coronavirus | अजय देवगणची मुलगी न्यासाला कोरोनाव्हायरसची लागण?
अजय देवगणच्या आधी अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोरोनाविरोधातील लढाईत लढणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले करणारांचा निषेध केला आहे. सोबतच पोलिस कर्मचारी जे या लॉकडाऊन दरम्यान सेवा देत आहेत, त्यांच्यावर देखील हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांचा बॉलिवूड कलाकारांनी निषेध केला आहे. याआधी ऋषी कपूर, जावेद अख्तर, हेमामालिनी, परेश रावल या कलाकारांनी अशा हल्ल्यांचा निषेध करत कारवाईची मागणी देखील केली आहे.