(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
नितीन गडकरी यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्वीट करुन सांगितलं की, “काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणी केल्यानंतर माझी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
नितीन गडकरी यांनी पुढे म्हटलं की, सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सोबत असून मी ठिक आहे. मी स्वत:चं विलगीकरण करुन घेतलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी सावधगिरी बाळगून नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षित रहा.
Yesterday, I was feeling weak and consulted my Doctor. During the course of my check up, I have been tested COVID 19 positive. I am at present doing well with the blessings and good wishes of all. I have isolated myself.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 16, 2020
आतापर्यंत मोदी सरकारमधील अनके मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्रसिंग शेखावत, श्रीपाद नाईक आणि सुरेश अंगडी यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या