Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी फोनवरून चर्चा केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि शरद पवार यांच्याचीही मोदींनी चर्चा केली.

Continues below advertisement

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे सर्वांनी सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे. सरकारकडूनही योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सर्वांशी चर्चा करुन या संकटातून देशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी  फोनवरुन चर्चा केली.

Continues below advertisement

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी फोनवरून बातचित केली. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि एच डी देवेगौडा यांच्याशाही मोदींनी फोनवरुन चर्चा केली. कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती नरेंद्र मोदींनी या नेत्यांनी दिली आणि त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या राजकीय अनुभव पाहता त्यांच्याकडून काही सूचनाही मागवल्या. विरोधीपक्ष नेत्यांशीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, द्रमुक प्रमुख एम.के. स्टालिन, तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर, अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांच्याशीही मोदींनी फोनवरुन संवाद साधला. राष्ट्रीय संकट असल्याने कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्वांच्या एकीची गरज आहे. या परिस्थितीत काय करता येईल यासाठी मोदी सर्वांशी संवाद आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 एप्रिलला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.

संबंधित बातम्या :
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola