Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली. हा कार चालक दारू पिऊन कार...More
पहाटे तीनच्या सुमारास हुक्का पार्लरमध्ये तरुण-तरुणींचा सुरू होता धिंगाणा
बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 74 जणांना केली अटक
हुक्का मालक आणि कामगार यांच्याकडून अवैधपणे तंबाखू युक्त हुक्का फ्लेवर अवैधरित्या विक्री करत असल्याची बी.के.सी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती माहिती
बी.के.सी पोलिसांना माहिती मिळताच हुक्का पार्लरवर आज पहाटे 3 च्या सुमारास धाड टाकून 69 हुक्का पोट सोबत 6 जरी,दोन चिमटे,एक शेगडी आणि चाळीस हजार रुपयांची रक्कम केली जप्त.
या ठिकाणी विकला जाणारा तंबाखू युक्त फ्लेवर हुक्का कुठून आणला गेला यामध्ये आणखी कोण आरोपी आहेत का याबाबत अधिक तपास बीकेसी पोलिसांकडून सुरू आहे...
पुणे
पुण्यातील सदाशिव पेठ अपघात प्रकरणी अपडेट
चालक जयराम मुळे याची येरवडा कारागृहात रवानगी
आरोपी चालकाला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं
यावेळी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे न्यायालयाच्या समोर मांडले
आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता असे असताना त्याने वाहन चालवण्याचे धाडस केले आणि यातून हा अपघात घडला
सर्व तांत्रिक पुराव्यासह साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयाला दिली माहिती
दारूच्या नशेत जयराम मुळे याने काल चहा पिण्यासाठी थांबलेल्या १२ जणांना उडवले होते
पुणे
पुण्यातील सदाशिव पेठ अपघात प्रकरणी अपडेट
चालक जयराम मुळे याची येरवडा कारागृहात रवानगी
आरोपी चालकाला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं
यावेळी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे न्यायालयाच्या समोर मांडले
आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता असे असताना त्याने वाहन चालवण्याचे धाडस केले आणि यातून हा अपघात घडला
सर्व तांत्रिक पुराव्यासह साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयाला दिली माहिती
दारूच्या नशेत जयराम मुळे याने काल चहा पिण्यासाठी थांबलेल्या १२ जणांना उडवले होते
Anchor:-
भिवंडी शहरातील एका मोबाईल ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या व्यवसायास ७० लाखांचे कर्ज मिळवून देतो सांगत त्याच्या नावे विविध कंपन्यांकडून तब्बल ६ कोटी रुपयांचे कर्ज घेणाऱ्या २४ जणांच्या टोळीचा मुख्य सूत्रधारास भिवंडी तालुका पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे.नरपतकुमार तलसाराम चौधरी वय 26 असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकांचे नाव असून सूरजपाल सिंह अजितसिंह चौहान असे अटक आरोपीचे नाव आहे.सुट्टीच्या दिवशीच्या भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास 4 जून पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
Vio 01:-
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरपतकुमार चौधरी याचे भिवंडी शहरात सप्टेंबर 2019 मध्ये मोबाईल ॲक्सेसरीज विक्रीचे दुकान सुरू केले होते.दुकानातील साहित्य खरेदीच्या निमित्त जी पॉवर एंटरप्राइजेस या कंपनीचे सूरजपाल सिंह चौहान यांच्या संपर्कात आले होते.2020 मध्ये स्वतःची ॲक्सेसरीज बनवणारी कंपनी सुरू करण्याची इच्छा बोलून दाखवली. यंत्रसामुग्री खरेदीसाठी 70 लाख रुपयांचे इंजेक्शन मोल्डिंग मशीन खरेदी करण्यासाठी 63 लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सूरजपाल सिंह चौहान यांनी मदत करण्याचे सांगत आपले कुटुंबीय ,चार्टर अकाउंटट व साथीदारा अशा 23 जणांच्या मदतीने नरपतकुमार चौधरी यास कर्ज मिळवून देण्यासाठी त्याच्या जवळील कागदपत्रे देऊन वेळोवेळी कर्ज मिळवून देऊ असे आश्वासन देत 2020 ते 2023 दरम्यान त्याचे बँक कागदपत्रे स्वतःजवळ ठेऊन त्याचा वापर कर्ज घेण्यासाठी करून त्या कागदपत्रांचा आधारे वेगवेळ्या बँका व खाजगी वित्तीय संस्था अशा मिळून 6 कोटी 29 लाख 61 हजार 281 रुपयांचे कर्ज घेऊन ते पैसे स्वतःच्या बँक खात्यात वळते करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने नरपतकुमार चौधरी यांनी भिवंडी ग्रामीण पोलिस ठाण्यात ऑक्टोबर 2024 मध्ये दिलेल्या तक्रारीवरून सूरजपाल सिंह चौहान व त्यांच्या 23 साथीदारांसह एकूण 24 जणां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.यातील मुख्य सूत्रधार सूरजपाल सिंह चौहान या शनिवारी भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यास भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास 4 जून पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण म्हसकर हे करीत आहेत.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त परळीसह गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन
मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मान्यवरांची राहणार उपस्थिती
Ac - भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजीच्या स्मृतिदिनानिमित्त परळी शहर व गोपीनाथ गड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
यामध्ये 2 जून रोजी वैद्यनाथ मंदिर परिसरात कापडी पिशवी मशीनचे उद्घाटन केले जाणार आहे.याबरोबरच मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम व वैद्यनाथाची महाआरती केली जाणार आहे.यानंतर आनंदधाम परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे.तर 3 जून रोजी गोपीनाथ गड येथे रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराबरोबरच वृक्ष रोपांचे वाटप केले जाणार आहे.
Anchor :- घराबाहेर शौचालय बांधण्याच्या वादातून एका तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना कल्याण उंबर्डे परिसरात घडली . विक्रांत जाधव असे या जखमी तरुणाचे नाव आहे . जाधव यांच्या शेजारी राहणाऱ्या गायकवाड कुटुंबानतील तरुनांनी हा हल्ला केल्याचा आरोप विक्रांत जाधव आणि त्यांचे वडील विजय जाधव यांनी केला . विक्रांत वर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय
व्हीओ :- कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात विजय जाधव हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या शेजारीच गायकवाड कुटुंब राहते . विजय जाधव राहत असलेल्या घराच्या जागेवर गायकवाड कुटुंबीयांनी दावा केला असून या जागेवरून जाधव व गायकवाड कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत . विजय जाधव यांनी आपल्या घराशेजारी शौचालय बांधण्याचे काम सुरू केले होते या कामाला गायकवाड कुटुंबाने विरोध केला . आठवडाभरापूर्वी हे काम सुरू असताना गायकवाड कुटुंब या ठिकाणी आले व त्यांनी हे काम बंद पडल्याचा आरोप विजय जाधव यांनी केलाय . तसेच गायकवाड कुटुंबियांनी त्यांना काम सुरू केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप देखील विजय जाधव यांनी केला . आज सकाळी विजय जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव हा घराशेजारील परिसरात पाणी आणण्यासाठी गेला याच वेळेस विक्रांतला एकट्याला गाठून गायकवाड कुटुंबातील तरुणांनी विक्रांतवर तलवारीने हल्ला केला .या हल्ल्यात विक्रांत जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादी काँग्रेस चे दोन नवीन शहराध्यक्ष
पुणे शहराला दोन शहराध्यक्ष
माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या पूर्व पुणे शहराची जबाबदारी
सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी
सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादी काँग्रेस चे दोन नवीन शहराध्यक्ष
पुणे शहराला दोन शहराध्यक्ष
माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या पूर्व पुणे शहराची जबाबदारी
सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी
सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादी काँग्रेस चे दोन नवीन शहराध्यक्ष
पुणे शहराला दोन शहराध्यक्ष
माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या पूर्व पुणे शहराची जबाबदारी
सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी
हगवणे बाप-लेक आणि निलेश चव्हाणची एकत्र चौकशी सुरु.
-वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आठ दिवस फरार असलेला आरोपी नीलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय
-या आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याचा सहभाग होता किंवा नाही? या संदर्भात निलेश चव्हाण,राजेंद्र हगवणे,सुशील हगवणे यांना समोरासमोर बसवत करणार चौकशी
-त्याचप्रमाणे निलेश चव्हाण चा शशांक हगवणे आणि वैष्णवी यांच्या लग्न बैठका तसेच दोघांच्या वादामध्ये सहभाग होता वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील याच्या मदतीने सासू लता नंनद करिष्मा यांचे मोबाईल त्यांनी नेले आहेत या सर्वांना समोरा-समोर बसून याची चौकशी बावधन पोलीस करणार
-आरोपी निलेश चव्हाण,राजेंद्र हगवणे,सुशील हगवणे या तिघांना बावधन पोलिस ठाण्यात एकत्र चौकशी साठी आण्यात आलं आहे
हगवणे बाप-लेक आणि निलेश चव्हाणची एकत्र चौकशी सुरु.
-वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आठ दिवस फरार असलेला आरोपी नीलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय
-या आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याचा सहभाग होता किंवा नाही? या संदर्भात निलेश चव्हाण,राजेंद्र हगवणे,सुशील हगवणे यांना समोरासमोर बसवत करणार चौकशी
-त्याचप्रमाणे निलेश चव्हाण चा शशांक हगवणे आणि वैष्णवी यांच्या लग्न बैठका तसेच दोघांच्या वादामध्ये सहभाग होता वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील याच्या मदतीने सासू लता नंनद करिष्मा यांचे मोबाईल त्यांनी नेले आहेत या सर्वांना समोरा-समोर बसून याची चौकशी बावधन पोलीस करणार
-आरोपी निलेश चव्हाण,राजेंद्र हगवणे,सुशील हगवणे या तिघांना बावधन पोलिस ठाण्यात एकत्र चौकशी साठी आण्यात आलं आहे
महाड विन्हेरे रस्त्यावर दापोली कडून पिंपरी चिंचवड कडे जाणा-या शिवशाही बसचा अपघात...
रस्त्यावरुन बस घसरुन थेट झाडावर आदळली..
अपघातात नऊ जण जखमी
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली...
जखमींना महाड येथील ट्रामा केअर सेंटर मध्ये उपचाराकरिता दाखल
बीड: जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद आहे. या पावसाने मोठ्या क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून एका शेतकरी महिलेने टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश केलाय..
लालाबाई जयराम धोंडे यांनी एक एकरभर टोमॅटोची लागवड केली होती. उन्हाळ्यात ठिबक वर पाणी देऊन टोमॅटोचे चांगले उत्पादन काढण्यात आले. मात्र बाजारात जाण्यापूर्वीच पाऊस झाला. आणि या पावसाने टोमॅटोचा लाल चिखल झाला.. डोळ्या दुखत ही अवस्था पाहून लालाबाई यांनी या टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश व्यक्त केला. या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकरी महिलेने केली आहे..
मोठमोठ्या शहरांमध्ये आपण ड्रगच्या सेवन करीत असल्याच्या आणि ड्रग साठा पकडण्याचा बातम्या पण नेहमीच ऐकतो ....परंतु आता हा ड्रगचे रॅकेट गोंदिया जिल्ह्यात सुद्धा येऊन पोहोचलेला आहे. आणि अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे दिसून येत आहे. आणि अनेक पालकांची आता चिंता उडवणारी ही बाब आहे... आज गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे एमडी ड्रगच्या 1.6 ग्रॅमच्या साठ्यासह बस स्थानकावर दोघांना अटक करण्यात आली. आरोपी हेमकृष्ण तरजुले रा.साकोली आणि विकी राऊत रा . देवरी या दोघांना एमडी ड्रगच्या साठासह देवरी पोलिसांनी अटक केली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे... त्यामुळे या ड्रग आता महानगरांच्या नंतर आता गावातही पोहोच असल्याचे दिसून येत आहे... याप्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करीत आहे.....
Nashik Crime: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा नातेला काळिमा फसणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील 4 विद्यार्थिनीने विनयभंगाचा गंभीर आरोप केला. या प्रकणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण रमेश घोलप असे संशयित प्राचार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिकमध्ये एका खाजगी नर्सिंग कॉलेज मध्ये. पीडिता ५ ऑगस्ट २०२४ पासून २९ मे २०२५ पर्यंत द्वारका सर्कल येथील एका कॉलेज ऑफ नर्सिंग येथे शिक्षण घेत होती. या काळात प्राचार्य प्रवीण घोलप यांनी वारंवार पीडितेस त्रास देत शारीरिक संबंधांची मागणी केली. तिच्या खांद्यावर, छातीवर आणि पाठीवर हात फिरवला, तसेच हात हातात घेऊन अश्लील स्पर्श केला. त्याने पीडितेची साडी ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील नजरेने पाहून तिचा विनयभंग केला. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटना घडली त्यावेळेस पीडिता अतिशय घाबरलेली होती. तिच्या अन्य मैत्रीण बरोबरही असाच प्रकार घडला असल्याची माहिती तिला समजतात तिने भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चार वेगवेगळ्या गुन्हे दाखल करून संशयित प्रवीण रमेश घोलप (वय ४०) याला अटक केली. गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव करत आहे.
Pune News पुणे: निलेश चव्हाणच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळं त्याच्या पहिल्या लोकेशनचा क्लु पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाला. तर फेसटाईम कॉलने निलेशचं नेपाळमधील लोकेशन ट्रेस झाला अन त्यानंतर दहा दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या पडल्या. 26 मे ला नेपाळमध्ये पोहचताच निलेशने तिथले सिम कार्ड घेतले. याचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला, याद्वारे त्याने अँपल फोनमधील फेसटाईम कॉलिंग केलं. फेसटाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही, असा त्याचा समज होता. मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागाने मोठा कस लावला अन फेसटाईम कॉलिंगचे आयपी अडड्रेस मिळवले. या आधारे त्यांना निलेशचे नेपाळमधील लोकेशन प्राप्त झाले. त्यामुळं निलेशला भारतात घटस्फोटित मैत्रिणीला सोबत घेऊन फिरणं अन नेपाळमध्ये फेसटाईम कॉलिंग करणं भोवल्याचं दिसून आलं.
गडचिरोली: कोरची मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस मदत केंद्र बेडगाव अंतर्गत येणाऱ्या कोरची- कुरखेडा मार्गावर नातेवाईकाची प्रकृती बघण्याकरिता पती-पत्नी जामटोला येथून कोरची येथे जात असताना 60 वर्षे महिलेचा मृत्यू झाला. राजाराम उसेंडी वय 66 व रेवताबाई उसेंडी वय 60 हे दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या सुसाट ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की रेवताबाई यांच्या शरीराचा पूर्ण चेंदामेंदा झाला व राजाराम यांचा पाय पूर्णपणे तुटला तसेच त्यांना गंभीर दुखापत सुद्धा झाली. घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला. अपघातात जखमी रुग्णावर उपचार सुरू असून ट्रक चालकाच शोध घेतला जात आहे.
बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा व खानदेशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
Washim : वाशिम जिल्हा रुग्णालयात १९ मे रोजी (पोटाच्या विकार) अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेवेळी (ऑपरेशन) दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची घटना समोर आली आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली.
डॉक्टरांनी या घटनेमागे "तांत्रिक बिघाड" असल्याचे सांगत ती अनावधानाने घडल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून, या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील कार्यपद्धती, तांत्रिक उपकरणांची स्थिती आणि शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
Beed : बीड जवळील बिंदुसरा धरण परिसरात तरुणाईचे सेल्फी करिता आणि पाण्याचा आनंद घेण्याकरिता अनाठाई धाडस दिसून येत आहे.. मे महिन्यातच बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओवरफ्लो झालंय.. त्यामुळे धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आणि याच पाण्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलीय.. मात्र काही हौशी मंडळी धरणाच्या सांडव्यावर बसून नसते धाडस करत आहेत.. त्यामुळे इथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.. पर्यटकांची गर्दी पाहता सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक आहे.. मात्र इथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा दिसून येत नाहीये..
पुण्यातील सदाशिव पेठेतील अपघात प्रकरण
कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक
कारचालक मुळे याच्यासोबत असलेल्या सहकार्याला सुद्धा विश्रामबाग पोलिसांनी केली अटक
जयराम शिवाजी मुळे असे या चालकाचे नाव असून दिगंबर माधव शिंदे हा या गाडीचा मूळ मालक आहे
जयराम मुळे याच्यासोबत असलेला सहकारी राहुल गोसावी याला सुद्धा केली पोलिसांनी अटक
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे याने त्याच्या मालकीच्या कारची चावी निष्काळजीपणे तशीच गाडीला सोडून बाहेर गेल्यामुळे त्याचा सहकारी जयराम मुळे याने त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील त्याचा सहकारी राहुल गोसावी याच्यासोबत दारूच्या नशेत वाहन थेट सदाशिव पेठेत नेले
या अपघातात 11 लोकांना किरकोळ व गंभीर जखम केल्याप्रकरणी आता तीन जणांना अटक करण्यात आली आहे
या तिघांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येईल
भीमा नदीवरील महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर असलेल्या लवंगी - सादेपूर दरम्यान कर्नाटक हद्दीत असलेल्या उमराणी गावात कर्नाटक सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित बंधारा बांधलाय. सोलापूर जिल्ह्यात यंदा में महिन्यात झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे हा बंधारा तुडुंब भरला आहे. खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी या बंधाऱ्याची विहंगम दृश्य टिपली आहेत ड्रोन पायलट ओंकार दीक्षित यांनी..
कर्नाटक सरकारने जवळपास 133 कोटी खर्च करून हा बंधारा बांधलाय. जवळपास 30. फूट उंची असलेल्या या बंधऱ्यात पाऊण टीएमसी पाण्याची साठवण क्षमता आहे.
विशेष म्हणजे या बंधाऱ्याचा सोलापूर जिल्ह्याला फायदा होणार असून सोलापूरकरांना या बंधाऱ्याच पाणी पिण्यासाठी मिळणार आहे. या बंधाऱ्यामुळे 10 हजार 120 एकर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे. त्यातील 9215 एकर क्षेत्र कर्नाटक तर 815 एकर क्षेत्र महाराष्ट्रतील ओलिताखाली येईल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर दोरीने बांधून चटके दिले. सासरच्या लोकांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे घडली. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीम अब्दुल शेख राहणार चौका वाडी आणि नणंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख असे आरोपीचे नाव असून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड: आजपासून खोल समुद्रातील मासेमारीवर दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 31 जुलैपर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यविभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग,मुरूड, नागाव, श्रीवर्धन, भरडकोल, जीवनाबंदर परिसरात मासेमारी करणाऱ्या बोटी आता किनाऱ्यावर विसावा घेत आहेत.ही बंदी दरवर्षीप्रमाणेच माशांच्या प्रजनन काळात त्यांचे संख्यावाढीचे प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी लागू केली जाते. यामुळे मासे आणि इतर सागरी जीवांचे संवर्धन होण्यास मदत होते.
बीड: बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती आहे
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आले
तसेच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे
दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात
गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा हजेरी
पुणे वेधशाळे कडून पुणे शहरासहजींना आज ऑरेंज अलर्ट
पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात
सकाळी सकाळी अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ
आज पुणे शहरात दिवसभर पावसाची शक्यता
विदर्भ क्रिकेट असोसिएशनची विदर्भ प्रो टी-20 लीग पाच जून पासून... आधीच रणजी चॅम्पियन असलेल्या विदर्भात या स्पर्धेनंतर t20 चे ही दर्जेदार खेळाडू निर्माण होतील अशी विदर्भ क्रिकेट असोसिएशनची अपेक्षा...
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विदर्भ प्रो. T 20 लीगची 5 जून पासून सुरुवात होणार आहे... त्यासाठी पुरुष आणि महिला संघांची घोषणा करण्यात आली आहे. 5 ते 15 जून या कालावधीत नागपूरमधील जामठा व्हीसीए स्टेडियमवर ही प्रो T 20 क्रिकेट लिग खेळवली जाणार असून या लीगमध्ये पुरुषांचे सहा संघ तर महिलांचे तीन संघ सहभागी होणार आहे. विदर्भ प्रो T 20 क्रिकेट लीगमुळे विदर्भातील स्थानिक खेळाडूंना T 20 क्रिकेटचे उच्च दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.. त्यामुळे रणजी माध्यमातून कसोटी क्रिकेट मध्ये आधीच दर्जेदार खेळू देणाऱ्या विदर्भात t20 फॉर्मेट साठीच्या नव्या खेळाडूंचा उदय होण्याची शक्यता आहे..
- मुंबईच्या जुहू चौपाटी परिसरात समुद्रात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू,
जुहू कोळीवाडा जेट्टी परिसरात काल हा तरुण आपला मित्रांसोबत फिरायला गेला होता,
संध्याकाळी साडेचार च्या सुमारास सेल्फी घेत असताना त्याचा पाय घसरला आणि पाण्यात पडला,
मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव अनिल असून तो 24 वर्षाचा होता...
पालिकेचा लाईफ गार्ड कडून तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यात आला मात्र पोटात पाणी जास्त गेल्यामुळे त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाली,
सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात मध्ये पाठवण्यात आली आहे, पुढील तपास सांताक्रुझ पोलीस करत आहेत....
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत असताना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातही एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे... पारशिवनी तालुक्यातील खैरी शिवारात काल दुपारी वाघाने रवींद्र काळसर्पे (वय वर्ष 38) या शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला आणि त्यांचा जीव घेतला... रवींद्र आपल्या पत्नीसह शेतावर लाकडं आणायला गेले होते.. शेतातील लाकडे वेचताना पत्नी शेजारच्या शेतावर काही कामानिमित्त गेली आणि तेव्हाच मोका साधून वाघाने रवींद्र यांच्यावर पाठीमागून हल्ला करत जवळच्या नाल्यात ओढत नेले.. नाल्या जवळून जाणाऱ्या एका शेतकऱ्याने ही घटना पाहिली त्याने आरडाओरडा केल्यामुळे वाघ रवींद्र यांना त्याच ठिकाणी टाकून पळून गेला... मात्र तोवर रवींद्र यांचा जीव गेला होता...
काही महिन्यांपूर्वी ही पारशिवनी परिसरात एका शेतमजुराचा ही वाघाने बळी घेतला होता.. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन ही केले होते...
पुणे: दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन या ट्रेनला सुरू होऊन आज ९६ वर्ष पूर्ण होतायत. पुणे, मुंबई या २ मेट्रो शहराला जोडणारी भावनिक दुवा असलेली ही ट्रेन अनेक पिढ्यांच्या आठवणींची साक्षीदार आहे. मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित व लोकप्रिय ट्रेन पैकी एक असलेल्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा सेलिब्रेशन जोरदार केले गेले. पुणे रेल्वे स्टेशन वर आज केक कापून उत्साहात डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने गाडीच्या इंजिनला हार व फुलांनी सजविण्यात आले होते.१ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे.
राज्यातील मराठी शाळा वाचवण्यासाठी शहरात मनसे आणि शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू असताना आता ग्रामीण भागातही जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यने पुढाकार घेत या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतीच्या करातून संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळा या ग्रामपंचायतीने शारदादेवी नावाचा उपक्रम सुरू करी जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना कोणताही कर आकारला जाणार नसल्याचे आज माजी आमदार दीपक साळुंखे यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या आवाहनानंतर पंढरपूर तालुक्यातील कोर्टी ग्रामपंचायत तिनेही याच पद्धतीचा निर्णय घेत या अभिनव उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "शिवसंपर्क अभियान" अंतर्गत शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे मालेगावमध्ये जनतेशी संवाद साधणार आहेत.शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या अभियानासाठी जोरदार तयारी केली असून, पक्षाच्या धोरणांची माहिती व जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.या अभियानाद्वारे शिवसेना पक्षाची भूमिका, भविष्यातील योजना आणि जनतेशी असलेला थेट संवाद यावर भर दिला जाणार असून मालेगाव परिसरात पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरण
रॅगिंग प्रकरणी तीन डॉक्टरांवर कारवाई
बी. जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टर ६ महिन्यांसाठी निलंबित
निलंबित डॉक्टर यांना महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेशबंदी
शैक्षणिक व परिषदांतील सुद्धा या डॉक्टरांच्या सहभागावर बंदी आणि प्रत्येकी १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे
२८ एप्रिल रोजी आलेल्या तक्रारीनंतर चौकशी समितीने ४ दिवसांत सखोल चौकशी करून ही कारवाई सुचवली
डॉ. अथर्व घोरपडे, डॉ. गौरव तिवारी आणि डॉ. राहुल जाधव यांनी रॅगिंग केल्याचे निष्पन्न झाले
पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका भरधाव वेगात आलेल्या कार ने 12 जणांना उडवलं होतं. या प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणी नंतर स्पष्ट झालं आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५(ब), २८१ अन्वये आणि मोटार वेहिकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल झालेल्या अपघातात ९ जणं जखमी झाले होते तर यातील २ जणं हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते.
गोव्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला मध्यरात्री पावणेतीन वाजता मुंबई गोवा हायवेवरील राजापूर जवळच्या कोंडी गावाजवळ अचानक आग लागली. सदरचा कंटेनर हा मॅगीने भरलेला होता. आग लागल्यानंतर राजापूर अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करून पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी आरोपी तरुण मंगेश रहांगडाले (२५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पीपल्स कला मंच आणि गटसाधन केंद्र गर्ल्स हायस्कूल अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दहा दिवसापासून नाट्य अभिनय व्यक्तिमत्व विकास शिबिर अमरावती येथील गर्ल्स हायस्कूल येथे सुरू असून या शिबिरातील चिमुकल्यांनी जंगलाचा आणि पशु पक्षांचा अभ्यास करण्यासाठी एक दिवस जंगल भ्रमण केले आणि पशुपक्षी जंगलाच निरीक्षण करून अभ्यास केला.. अमरावती लगतच्या छत्री तलाव परिसरातील जंगलामध्ये विद्यार्थ्यांनी जंगल भ्रमण केले यामध्ये विविध पक्षांची ओळख जंगलातील विविध झाडांची ओळख यावेळेस विद्यार्थ्यांना करून देण्यात आली..
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाजगी बस आणि आयसर टेम्पोमध्ये भीषण अपघात .
तलासरीच्या धुंदलवाडी येथील घटना .
मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर अपघात .
अपघातात खाजगी बस मधील वाहकाचा जागीच मृत्यू तर तीन प्रवासी जखमी .
रियाज असं मृत वाहकाचं नाव .
अपघातामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी .
सात ते आठ किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा .
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
पुणे पोलीसांच्या मनमानी कारभारामुळे पुण्यातील पाषाण, बाणेर , शिवाजीनगर , बावधन भागातील रस्ते पहाटे साडे चार वाजल्यापासुन बंद ठेवण्यात आलेत. पोलीस डिपार्टमेंट , वन विभाग आणि एका खाजगी संस्थेकडुन वृक्षाथॉन या मॅरॉथॉन स्पपर्धेचे आयोजन करण्यात आलंय. मात्र या प्रमुख रस्त्यांवर मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची कोणतीही माहिती नागरिकांनी देण्यात आली नव्हती. ज्यांना हॉस्पीटल इमर्जन्सी आहे अशा लोकांनाही पोलीस जाऊ देत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
उसानंतर आता मराठवाड्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन शेतीसाठी सुद्धा AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव च्या उपळा गावात हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यासाठी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला असून राहुरी कृषी विद्यापीठाची पाहणी दौरा देखील केलाय. उपळा गावातील वेगवेगळ्या उत्पादन गटातील शेतकऱ्यांना घेऊन हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.
पावसामुळे तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गोमुख तीर्थातली झरा वहायला सुरुवात झाली. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बालाघाटच्या डोंगर रांगातील पाणी नैसर्गिक रित्या या झऱ्यातून देवीच्या मंदिरात पोहोचते.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...