Odd Symptom of new Covid : ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातलाय. ओमायक्रॉनच्या BA.5 आणि BA.4 या सबव्हेरियंटमुळे अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. BA.5 या सबव्हेरियंटचं नवीन लक्षण समोर आले आहे. रात्री तुम्हाला सतत घाम येत असेल तर BA.5 व्हेरियंटची लागण झालेली असू शकते. 


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री घाम येत असेल तर तुम्हाला ओमायक्रॉन झालेला असू शकतो. कारण हे ओमायक्रॉनच्या BA.5 चं नवे लक्षण आहे. बायोकॅमिस्ट्रीचे प्राध्यापक ल्यूक ओ'नील यांनी हा दावा केलाय. ते म्हणतात की, 'ओमायक्रॉनचा BA.5 या सबव्हेरियंटने पुन्हा एकदा आपलं रुप बदललं आहे. त्याच्या नव्या लक्षणानुसार रात्री झोपल्यानंतर जास्त घाम येतो.'  ट्रिनिटी कॉलेजच्या प्राध्यपकांनी BA.5 व्हेरियंटबाबात (BA.5 Variants) इशाराही दिलाय. 'डेली स्टार' च्या रिपोर्ट्सनुसार, शरीराच्या पेशींमध्ये प्रतिकारशक्ती असते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि कोरोना विषाणू यांचे मिश्रणामुळे आजार होऊ शकतो. यामध्ये रात्रीच्या वेळी घाम येणे याचाही समावेश आहे. 


दरम्यान, रात्रीच्या वेळी घाम येण्याचा आजार वयोवृद्ध आणि लहान मुलांमध्ये आहे. इतकेच नाही तर रुमचं वातावरण थंड असेल तेव्हाही घाम येऊ शकतो. प्राध्यपक ओ'नील यांनी याबाबत इशाराही दिलाय. ते म्हणतात की, या नवीन कोरोना विषाणूचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो, त्यामुळे वेगळा आजार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.  


लक्षणं काय?
ओमायक्रॉन आजाराची अनेक लक्षणे तिसर्‍या लाटेत दिसली. ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, भूक न लागणे, स्नायू कमकुवतपणा, कफ आणि थकवा यासारखी लक्षणे जाणवत होती. यामध्ये आता रात्री झोपेत घाम येणे या लक्षणाची भर पडली आहे.


ओमायक्रॉन व्हेरियंटची लक्षणे दिसल्यास काय करावे?
ओमायक्रॉन संसर्ग शोधण्याची अचूक पद्धत RT-PCR चाचणी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसतात. तेव्हा शक्य तितक्या लवकर स्वतःची तपासणी करा. ज्या लोकांना सर्दीची लक्षणे दिसतात त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन संसर्ग वाढण्यापासून रोखता येईल. याबरोबरच असा सल्लाही देण्यात आला आहे की, जोपर्यंत चाचणीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवावे. असे केल्याने तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होण्यापासून वाचवू शकता.


 दरम्यान, कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. संपूर्ण जगभरातच कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. जगातील 50 देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. भारतात देखील कोरोना रूग्णांमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होत आहे.