NCB Destroyed Drugs :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत  डिजिटल माध्यमातून 30 हजार किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.  अमित शहा यांनी आज चंदीगड येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला हजेरी लावली. यावेळी दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या पथकाने गृहमंत्र्यांसमोर 30 हजार किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट केले. 






एनसीबीने 1 जूनपासून ड्रग डिस्पोजल मोहीम सुरू केली आहे.  या मोहिमेअंर्गत 29 जुलैपर्यंत 11 राज्यांमध्ये 51,217 किलोहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार NCB ने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने 75,000 किलो अमली पदार्थ नष्ट करण्याचा संकप्ल केला आहे.  


शनिवारी 30,468.784 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थांची विल्हेवाट लावल्यानंतर आतापर्यंत 81,686 किलो अमंली पदार्थ नष्ट करण्यात आले आहे.  


एनसीबीकडू या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी अमित शाह म्हणाले, "2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा भारत सरकारने ड्रग्सबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले होते. अमली पदार्थांविरुद्धच्या वेगवान कारवाई होत आहेत. नशा तरुण पिढीवर विपरित परिणाम करते. देशातील हे संकट संपवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे." 


महत्वाच्या बातम्या


PM मोदींनी न्याय सुलभ करण्यावर दिला भर, म्हणाले, अंडरट्रायल कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया वेगवान करा 


Rahul Gandhi Tweet : राहुल गांधींच्या 'त्या' ट्विटने बदलले युवा गोलंदाजाचे नशीब! क्रिकेट अकादमीत मिळणार प्रशिक्षण