Coronavirus India: देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus Updates) धोका वाढला आहे. कोरोनाच्या वाढत्या (Covid-19) प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक राज्यांनी चाचण्या वाढवल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची जलद कोरोना तपासणी सर्व राज्यांच्या विमानतळांवर सातत्यानं केली जात आहे. तसेच, देशात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांनंतर साप्ताहिक कोविड प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे. 


दरम्यान, चीनसह (China Corona Update) जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना बाधितांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, यामध्ये भारतातील कोरोना बाधितांच्या आकडेवारी मात्र स्थिरच आहे. रविवारी संपलेल्या आठवड्यात देशातील रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, देशातील चाचणीत झालेली वाढ. गेल्या आठवड्यात 1103 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर, या आठवड्यात 1219 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. याचाच अर्थ, 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


'या' राज्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला 


महाराष्ट्र (Maharashtra), राजस्थान (Rajasthan), पंजाब (Punjab), दिल्ली (Delhi) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) तसेच तेलंगणा (Telangana) आणि पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) कोरोना प्रादुर्भावात किंचित वाढ झाली आहे. 


'या' राज्यांमध्ये साप्ताहिक कोरोना बाधितांमध्ये वाढ 


या आठवड्यात, 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना बाधितांच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. नऊ राज्यांमधील प्रकरणं गेल्या आठवड्याप्रमाणेच समान पातळीवर राहिली, तर इतर 11 राज्यांमध्ये या आठवड्यात कमी प्रकरणं नोंदवली गेली. ज्या राज्यांमध्ये प्रकरणं वाढली आहेत. त्यापैकी फक्त राजस्थान आणि पंजाबमध्ये 30-30 पेक्षा जास्त रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे, केरळमध्ये 31 रुग्णांमध्ये घट झाली आहे.


राज्यात काल (सोमवार) 15 कोरोनाबाधीतांची नोंद


राज्यात काल 15  करोना बाधित रुग्णांची नोंद, तर एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यू झाला नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८७,९५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17 टक्के एवढं झालं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Coronavirus: देशातील सर्व रुग्णालयांमध्ये आज मॉकड्रिल, चीनमधील कोरोना उद्रेकानंतर केंद्र सरकारची खबरदारी