(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus India Updates : पुन्हा एकदा वाढला देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा; 24 तासांत 18,987 रुग्णांची नोंद
Coronavirus India Updates : देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 987 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 246 रुग्णांनी कोरोनामुळं जीव गमावला आहे.
Coronavirus India Updates : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावतोय. गेल्या 24 तासांत 18 हजार 987 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी देशात 15 हजार 823 रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 226 रुग्णांचा मृत्यू झाला होता. काल नोंद करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्याच्या तुलनेत आजचा आकडा हा 16 टक्क्यांनी अधिक आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 19 हजार 808 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 6 हजार 586 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 33 लाख 62 हजार 709 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 51 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात काल (बुधवारी) 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 49 रुग्णांचा मृत्यू
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (बुधवारी) 2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे.
राज्यात काल (बुधवारी) 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 281 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (2), धुळे (8), जालना (37), परभणी (53), हिंगोली (18), नांदेड (14), अमरावती (96), अकोला (27), वाशिम (05), बुलढाणा (14), यवतमाळ (08), नागपूर (70), वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), गडचिरोली (13 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,32,261 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,122 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 05, 46, 572 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,83, 896 (10.87टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 481 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 481 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 461 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,25,282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5114 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1102 दिवसांवर गेला आहे.