मुंबई : कोरोना महामारीने भारतासह जगभरात थैमान घातलं आहे. इटली, इराण, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तानसह जगभरातीन अनेक देश या जीवघेण्याता कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केलं आहे. भारतात हा लॉकडाऊन तीन आठवडे म्हणजे 21 दिवस चालणार आहे.


भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 11 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 536 वर गेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि जगात काय घडतंय आणि काय निर्णय घेतले जात आहेत.


जगभरात काय बदल झालेत?




  • कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जुलै-ऑगस्टमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय.

  • थायलंडमध्ये आणीबाणीची घोषणा, आर्थिक मदतीचीही घोषणा.

  • चीनच्या हुबेई प्रांतातील प्रवास बंदी आजपासून हटवणार.

  • मकाऊने हाँगकाँग आणि चीनमधून येणार्‍या लोकांवर नवीन निर्बंध जाहीर केले.

  • ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे 8000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. 422 लोकांचा मृत्यू.

  • ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कॅबिनेटमधील सदस्यांना घरीच राहण्याची सूचना केली.

  • ब्रिटमध्ये सरकारच्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता.

  • अमेरिका कोरोनाचं नवं केंद्र बनण्याची शक्यता, डब्ल्यूएचओने तशी भीती व्यक्त केली आहे.

  • अफगाणिस्तानात चार नाटो सर्व्हिस सदस्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.

  • ऑस्ट्रेलियात लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित केली.

  • इजिप्तमध्ये दोन आठवड्यांसाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे.


संबंधित बातम्या