मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवस देशात लॉक डाऊन राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच, जान है तो जहान है... असे म्हणत नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले. परंतु या लॉक डाऊन काळात नेमंक काय बंद राहणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, सर्व जीवनावश्यक वस्तू सुरु राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गोंधळ न घालता, अफवा न पसरवता गर्दी टाळून या सेवांचा लाभ घेतला पाहिजे. देशातील व्यापारी आणि खासगी संस्था या लॉक डाऊन काळात बंद राहणार आहेत. या काळात जीवनावश्यक सेवा सुरू राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं.
लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार, काय बंद होणार ?
- कमीतकमी मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, स्टॉक एक्सचेंज, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या
- खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
- औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
- रुग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
- प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया
- टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
- शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
- बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
- देशातील सर्व मंदिरे, चर्च, मशिद, गुरूद्वारा सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. यामध्ये फक्त धर्मगुरूंना धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी असणार आहे.
- उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
- शाळा, महाविद्यालयं, कोचींग संस्था
- होम कॉरेन्टाईन केलेल्या रूग्णांनी असणाऱ्या नियम मोडल्यास त्यांना दंड किंवा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे,तसंच या व्यक्तींना सरकारी क्वारंटिन कक्षात ठेवण्यात येईल.
- अंत्यविधीसाठी देखील 20 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही
- राज्य परिवहन सेवा, खाजगी बस, मेट्रो, लोकल, विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. दोन प्रवाशांपेक्षा अधिक व्यक्तींची ने-आणि टॅक्सीने करता येणार नाही,तर रिक्षात फक्त एका प्रवाशासाठी परवानगी आहे.
- खासगी वाहनांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी आणि आरोग्यविषय समस्या यासाठीच रस्त्यावर येण्याची परवानगी आहे. या वाहनांमध्ये फक्त ड्रायव्हर आणि एक व्यक्तीलाच प्रवास करता येणार आहे.
संबंधित बातम्या :
India Lockdown : आज रात्री 12 पासून संपूर्ण देश पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी
देशात लॉकडाऊन असला तरी अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार : मुख्यमंत्री
India Lockdown| Narendra Modi|रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देश पुढील 21 दिवस लॉकडाऊन :नरेंद्र मोदी