मुंबई : पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा, त्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडणारी टोळकी शांत बसणार नाहीत, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यात. विनाकारण बाहेर हिंडणाऱ्या लोकांना एकप्रकारे सज्जड दमच अनिल देशमुख यांनी दिला आहे. राज्यात जमावबंदी असतानाही लोक गर्दी करत आहेत. त्यामुळेच नाईलाजाने संचारबंदी जाहीर करण्यात आल्याची माहिती देखमुख यांनी दिली. मात्र, यापुढे नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. कोरोना व्हायरसमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते.


कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील 90 टक्के जनता आम्हाला सहकार्य करत आहे. मात्र, पाचदहा टक्के लोकांमुळे पोलिसांवर ताण येत आहे. अशा लोकांना आता परिस्थितीचं गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे अशा लोकांना आता पोलीस वेगळ्या प्रकारे हाताळतील असा इशारा त्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे वारंवार सांगत आहे. मात्र, ही पाचदहा टक्के लोक ऐकताना दिसत नाही. त्यामुळे अशा लोकांविरोधात आम्ही गंभीर कारवाई करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा
राज्यात संचारबंदी असतानाही लोक विनाकारण बाहेर फिरत आहे. या लोकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. तुम्हाला अत्यावश्यक असेल तर तुम्ही जरुर बाहेर पडा. मात्र, आता नियमांचा भंग करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नसल्याचा इशाराच अनिल देशमुख यांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी आपल्या काठ्यांना तेल लावून ठेवा आणि अशा लोकांवर कारवाई करण्याच्या सुचानाही त्यांनी दिल्या. दरम्यान, या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात शंभरीपार
कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्यांचा आकडा आता वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 107 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यात मुंबईत सर्वाधिक 43 आहेत. तर, चार जणांचा मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत 11 जणांचा यात बळी गेलाय.

पिंपरी चिंचवड मनपा – 12

पुणे मनपा – 19

मुंबई शहर आणि उपनगर – 43

नागपूर – 4

यवतमाळ – 4

नवी मुंबई – 5

कल्याण – 4

अहमदनगर – 3

रायगड – 1
ठाणे – 2
पनवेल – 1
उल्हासनगर – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
वसई-विरार – 1

Solapur Market Crowded | सोलापूरकरांना कोरोनाची भीतीच नाही! खबरदारी न बाळगता बाजारात झुंबड