Coronavirus Cases Today:  कोरोनाबाधितांच्या (coronavirus) संख्येत सध्या घट झालेली पाहायला मिळत आहे. जगाची धाकधूक वाढवणाऱ्या ओमायक्रॉनचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव (Coronavirus) सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासांत  8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच  415 जणांचा मृत्यू झाला आहे.  जाणून घ्या देशातील सद्यस्थिती... 


आतापर्यंत 4 लाख 70 हजार 530 जणांचा मृत्यू झाला आहे 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या  99 हजार 974 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. रिपर्टनुसार, आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 53 हजार 856 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.



आतापर्यंत 126 कोटीपेक्षा अधिक डोस देण्यात आले आहेत
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 126  कोटीपेक्षा अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 73 लाख 63 हजार 706 डोस देण्यात आले. 126 कोटी 53 लाख 44 हजार 975  लसीचे डोस देण्यात आले आहेत.







भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव


गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या (coronavirus) संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने (omicron variant) आणखी चिंतेत भर घातली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटता शिरकाव झाला असून कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले  आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :