Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 7350 नवे कोरोना रुग्ण; तर ओमायक्रॉन बाधितांची संख्या 38 वर
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7 हजार 350 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7 हजार 350 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 38 रुग्ण समोर आले आहेत. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सध्याची स्थिती...
आतापर्यंत 4 लाख 75 हजार 636 रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 91 हजार 456 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशातच या महामारीमुळे जीव गमालेल्यांचा आकडा वाढून 4 लाख 75 हजार 636 वर पोहोचला आहे. तर 7973 रुग्ण काल दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 3 कोटी 41 लाख 30 हजार 768 वर पोहोचला आहे.
राज्यात काल (रविवारी) 704 नव्या कोरोना रुग्णांची भर
महाराष्ट्रात रविवारी 704 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 699 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात काल (रविवारी) 16 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची 66,43,883 इतकी झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 64,92, 504 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72% इतके झाले आहे. राज्यात सध्या 75,313 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 855 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,441 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव
मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने उपराजधानी नागपूरमध्ये शिरकाव केलाय. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ओमायक्रोन पॉसिटीव्ह आढळलेल्या 40 वर्षीय रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवासाचा इतिहास आहे. हा व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणीसह जीनोम सिक्वेन्सिंग ही करण्यात आली होती. त्यानंतरच त्याला ओमायक्रोन संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो रुग्णालयात उपचार घेतोय. संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले आहेत. त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. संबंधित रुग्णच्या संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग केली जात असून त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत. चार डिसेंबर रोजी संबधित व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. जनुकीय चाचणीत (जिनोम सिक्वेन्सिंग) त्याला ओमायक्रॉन असल्याचे निदान झाले आहे.
राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटची संख्या
नागपूरमध्ये रविवारी ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेहून आलेला नागपूर येथील ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 18 इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईत 5, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे मनपामध्ये एक, कल्याण डोंबिवली 1 आणि नागपूरमध्ये एक असे रुग्ण आढळले आहेत. 18 पैकी 9 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. नऊ रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात एक नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 107 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 26 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Omicron : ओमायक्रॉन दोन आठवड्यात कुठून कुठपर्यंत पोहोचला? जगाला ओमायक्रॉनचा किती धोका?
- Omicron : ओमायक्रॉन जीवघेणा नाही, सौम्य लक्षणं आणि रुग्णांचं प्रमाणही कमी; ओमायक्रॉनचा शोध लावणाऱ्या आफ्रिकेतील डॉक्टरांचं मत
- BMC Dharavi Pattern : ओमायक्रॉन रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा 'धारावी पॅटर्न-2' ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा