Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गातील चढउतार कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 706 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आधीच्या दिवसाच्या तुलनेत घसरल्याचं दिसून येत आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्याआधीच्या दिवशी 2828 नवे कोरोना रुग्ण आणि 14 जणांचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 17 हजार 698 इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
दोन हजार 70 रुग्ण कोरोनातून मुक्त
देशात रविवारी दिवसभरात म्हणजेच गेल्या 24 तासांत 2 हजार 70 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4, कोटी 26 लाख 13 हजार 440 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या 25 नवीन मृत्यूंसह कोरोना बळींची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात रविवारी 550 नव्या कोरोनाबाधितांची
रविवारी महाराष्ट्रात 550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 324 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77 लाख 35 हजार 8 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.09 टक्के इतके झाले आहे. महाराष्ट्रात एकूण 2997 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
दिल्लीत 357 नवे रुग्ण
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत रविवारी 357 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीतील कोरोना रुग्ण सकारात्मक दर 1.83 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकही नवीन मृत्यू झालेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या