Coronavirus Cases Today in India  : देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 2067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.


सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 860
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 860 इतकी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 1547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 13 हजार 248 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे.







 


आतापर्यंत 186 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 186 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 4 लाख 21 हजार 183 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 186 कोटी 76 लाख 37 हजार 48 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha