Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाच्या विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोना रुग्णांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 159 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 24 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5 लाख 25 हजार 270 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत 15 हजार 394 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे.


लसीकरणानं ओलांडला 198 कोटी लसींचा टप्पा
देशव्यापी लसीकरण मोहिमेत 198 कोटीं लसींचा टप्पा पार करण्यात आला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात आतापर्यंत 4 कोटी 35 लाख 47 हजार 809 लोकांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 4 कोटी 7 हजार 327 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 5 लाख 25 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत कोरोना लसीचे 198 कोटी 20 लाख 86 हजार 763 डोस देण्यात आले आहेत.






सक्रिय रुग्णांची संख्या 1,15,212 वर पोहोचली
देशात सध्या 1 लाख 15 हजार 212 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशातील कोरोना सकारात्मकता दर 3.56 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 15 हजार 394 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :