Jammu Kashmir : जम्मू काश्मीरच्या (Jammu-Kashmir) कुलगाममध्ये (Kulgam) भारतीय सैन्य (Indian Amry) दलाचं मोठं ऑपरेशन सुरु आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सैन्य दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत हादीगाम परिसरात सैन्य दलाचे जवान आणि पोलिसांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यावेळी दोन दहशतवद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. सैन्य दलाच्या जवानांनी मोठं यश मिळालं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आवाहन केल्यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या दोन दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सैन्य दल आणि पोलिसांनी स्पेशल इंटेलिजेंसकडून माहिती मिळाल्यानंतर जवानांनी ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांनी हादीगाम परिसरात दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्य दलाचे जवान आणि पोलिसांनी या परिसराला घेराव घातला.






जून महिन्यापर्यंत 130 दहशतवाद्यांचा खात्मा
गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर सैन्य दलानं मोठी कारवाई केली. जवानांनी अनेक दहशतवादी संघटनांचे कमांडर आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या वर्षी म्हणजेच 2022 च्या जू महिन्यापर्यंत जवानांनी 130 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दरम्यानच्या काळत 20 स्थानिक नागरिक आणि 19 जवानांचा मृत्यू झाला आहे.


अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सैन्य दल सतर्क


सध्या अमरनाथ यात्रा सुरु असल्यामुळे सैन्य दलाकडून सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या शिवाय पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :