Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा आलेख घटताना दिसत आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आठवड्याच्या शेवटी कमी होताना पाहायला मिळला. त्यानंतर आता सोमवारी या आठवड्याच्या सुरुवातीलाही कोरोनाचा आलेख घटताच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात 9531 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी ही संख्या 11,539 इतकी होती. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत 2008 रुग्णांची घट झाली असल्याने ही एक चांगली बातमी आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत देशात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,12,915 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,673 झाली आहे. सध्या मुंबईत 5,761 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 818 रुग्णांमध्ये 761 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 949 दिवसांवर गेला आहे.
महाराष्ट्रात 1832 नवे रुग्ण, दोन जणांचा मृत्यू
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 1832 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांमध्येम म्हणजेच रविवारी दिवसभरात एकूण 2055 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याआधी शनिवारी राज्यामध्ये 1,855 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात सध्या 11,641 इतके सक्रिय रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये असून ही संख्या 5761 इतकी आहे. त्या खालोखाल ठाणे जिल्ह्याचा क्रमांक असून ठाण्यात 1925 इतके रुग्ण सक्रिय आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या