एक्स्प्लोर

Covid19 : चांगली बातमी! कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, देशात 6168 नवे कोरोनाबाधित

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 6168 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत रुग्णसंख्या 1778 रुग्ण घटले आहेत.

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा प्रार्दुभाव (Coronavirus) दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दिवसभरात नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24  तासांत म्हणजेच गुरुवारी दिवसभरात 6 हजार 168 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत रुग्णसंख्या 1 हजार 778 रुग्ण घटले आहेत. बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या 7 हजार 946 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशात उत्साहाचं वातावरण असताना कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट ही दिलासादायक बाब आहे.

आतापर्यंत 5 लाख 27 हजार 932 रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 685 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशातील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. सध्या देशात 59 हजार 210 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 5 लाख 27 हजार 932 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

देशव्यापी लसीकरणात 212 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या

दरम्यान, देशात नोंद झालेल्यांपैकी सर्वाधिक रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 212 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. देशात गुरुवारी दिवसभरात 22 लाख 40 हजार 162 कोविड लसी देण्यात आल्या असल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशातील साप्ताहिक कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा 2.51 टक्के आहे. तर दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 1.94 टक्के आहे.

महाराष्ट्रात गुरूवारी 781 रुग्णांची नोंद
राज्यात गेल्या 24 तासांत 781 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गुरूवारी दिवसभरात एकूण 1523 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात चार कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,42, 981 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.05 टक्के इतकं झालं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
Pratibha Pawar Sonia Gandhi : प्रतिभा पवार- सोनिया गांधी यांची भेट, सुप्रिया सुळे यांच्याकडून फोटो शेअर, कॅप्शनमध्ये विशेष उल्लेख
प्रतिभा पवार- सोनिया गांधी यांची भेट, सुप्रिया सुळे यांच्याकडून फोटो शेअर, कॅप्शनमध्ये विशेष उल्लेख

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget