Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा दोन हजारांच्या वर पोहोचली आहे. काल हा आकडा दोन हजारांच्या खाली होता. मात्र गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 797 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल देशात 1997 नवीन कोरोनाबाधित आढळले होते. देशात शुक्रवारी दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तुलनेनं आज 800 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. यासोबतच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.
122 दिवसांनंतर उपचाराधीन रुग्णांची संख्या 30 हजारांच्या खाली
122 दिवसांनंतर देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांच्या खाली घसरली आहे. कालच्या तुलनेत 1 हजार 111 सक्रिय रुग्णांची घट झाली आहे. देशात सध्या 29 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. चांगली बाब म्हणजे कालपेक्षा आज सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या देशात 29 हजार 251 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सध्याचा कोरोना दैनंदिन पॉझिटीव्हिटी रेट 1.05 टक्के आहे, तर आठवड्याचा रुग्ण सकारात्मकता दर 1.30 टक्के इतका आहे.
देशात 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासांत देशात 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील कोरोनाबळींचा आकडा 5 लाख 28 हजार 754 पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 884 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यासह देशात आतापर्यंत 4 कोटी 40 लाख 51 हजार 228 कोरोना रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या