Air Force Day Celebration : आज भारतीय हवाई दल  (Indian Air Force) आपला 90 वा वायुसेना दिन साजरा करत आहे. विशेष बाब म्हणजे चंदीगडच्या (Chandigarh) प्रसिद्ध सुखना तलाव येथील आकाशात वायु सेनेची शक्ती दिसणार आहे, ज्याची गर्जना चीनच्या सीमेपासून ते पाकिस्तानपर्यंत ऐकू येईल. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) देखील उपस्थित राहणार आहेत.


वायु सेनेच्या जवानांना शौर्य पदके देण्यात येणार


यंदा वायुसेना दिन दोन भागात विभागला गेला आहे. आज सकाळी चंदीगड हवाई तळावर परेडचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी परेडची सलामी घेतील आणि जवानांना संबोधित करतील. तसेच एअर बेसवर हेलिकॉप्टरच्या दोन फॉर्मेशनचा फ्लाय पास्टही होणार आहे. याशिवाय हवाई दलातील जवानांना शौर्य पदके देण्यात येणार आहेत. या विशेष प्रसंगी वायु सेनेचे प्रमुख हवाई दलाच्या नवीन लढाऊ गणवेशाचेही प्रकाशन करतील.


राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्री राहणार उपस्थित


आतापर्यंत राजधानी दिल्लीला लागून असलेल्या हिंडन एअर बेसवर एअर फोर्स डे परेड आणि फ्लाय-पास्ट होत असे, मात्र यंदापासून हा फ्लाय पास्ट एअर बेसच्या बाहेर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी चंदीगडच्या सुखना तलावावर हा फ्लाय पास्ट आयोजित केला जाणार आहे. यावेळी हवाई दल प्रमुखांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत.


भारतीय वायु सेनेबद्दल जाणून घ्या


भारतीय वायु सेना हे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे असलेले हिंडन एअर फोर्स स्टेशन आशियातील सर्वात मोठे आहे. भारतीय वायुसेनेच्या स्थापनेपासून ते 'नभ: स्पृशम् दीपतम' या ब्रीदवाक्याचे अनुसरण करत आहे. याचा अर्थ 'अभिमानाने आकाशाला स्पर्श करणे.' वायुसेनेचे हे ब्रीदवाक्य भगवद्गीतेच्या 11 व्या अध्यायातून घेतले आहे. भारतीय हवाई दलाचे रंग निळे, आकाश निळे आणि पांढरे आहेत.


वायुसेना दिन कधी साजरा केला जातो?


भारतीय वायुसेना दिन दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी गाझियाबादमधील हिंडन एअर फोर्स स्टेशनवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये लष्कराच्या अधिका-यांसह अनेक दिग्गज सामील असतात, तसेच या दिवशी आकाशात शक्तिशाली चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली जातात