एक्स्प्लोर

Coronavirus Update | गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या 23 हजार नव्या रुग्णांची भर, दोन कोटी 40 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण

Coronavirus Cases India Updates: देशात आतापर्यंत एकूण 22 कोटी 50 लाख कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या असून गुरुवारी एकाच दिवशी 7.40 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

नवी दिल्ली : देशात गेले काही दिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असून गुरुवारी एकाच दिवशी  23 हजार 285 नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशात सलग नवव्या दिवशी 15 हजारांपेक्षा जास्त कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात 117 रुग्णांचा मृत्यू झाला असून 15,157 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत सांगण्यात आलं आहे.

देशातील आतापर्यंत कोरोनाचे एकूण एक कोटी 13 लाख आठ हजार 846 रुग्ण झाले असून आतापर्यंत एकूण एक लाख 58 हजार 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या एक लाख 97 हजार 237 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या असून ती 22,52,057 इतकी झाली आहे. 

देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.40 इतका आहे तर रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांचा दर हा 1.68 आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात 11 वा क्रमांक आहे. 

MPSC Exam Date 2021 | एमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर

गुरुवारपर्यंत देशात दोन कोटी 61 लाख 64 हजार 920 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. गुरुवारी एकाच दिवसात चार लाख 80 हजार 740 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

देशात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. रिपोर्टनुसार 2,40,37,644 जणांना वॅक्सीन देण्यात आले आहे. 

लसीकरणाच्या 53 व्या दिवशी संध्याकाळी 7 पर्यंत 10 लाख 28 हजार 911  जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 98 हजार 354 लोकांना पहिल्यांदा लस देण्यात आली.  2 लाख 30 हजार 557 आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्स यांना कोरोनाची लस देण्यात आली. लस घेतलेल्यांपैकी 5 लाख 51 हजार 398 नागरिक हे 60 वर्षापेक्षा जास्त असून 98 हजार 478 हे वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.

पाकिस्तानातून परतलेली मुकबधीर गीता गिरवतेय मराठी, गणिताचे धडे; परभणीच्या पहल फाऊंडेशनकडून सांभाळ

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget