Coronavirus Cases in India : कोरोना महामारीच्या नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 915 नवीन रुग्ण आढळून आले असून 180 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान 16 हजार 864 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 29 लाख 31 हजार 45 झाली आहे. तर आतापर्यंत 5 लाख 14 हजार 23 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 472 वर पोहोचली असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 23 लाख 24 हजार 550 वर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 14 हजार 23 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 92 हजार 472 वर पोहोचले आहेत, तर एकूण बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 23 लाख 24 हजार 550 वर गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना विषाणू संसर्गाचे दैनंदिन प्रमाण सुमारे दोन महिन्यांनंतर 10 हजारांपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी देशातील संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली.
देशात कोरोनाबाधितांचा आकडा 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी एक कोटींचा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांचा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला होता आणि 23 जून 2021 रोजी तीन कोटींच्या पुढे गेला होता. यावर्षी 26 जानेवारीला रुग्णांची संख्या चार कोटींच्या पुढे गेली होती. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर आजारही होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल
- Russia Ukraine War : कॅनडाकडून रशियन तेल आयातीवर बंदी, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले...
- Russia Ukraine War : युक्रेनला भारताकडून मदतीचा हात; पहिली खेप आज होणार रवाना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha