Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव दिवसागणिक कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे एकूण 3 हजार 614 नवीन रुग्ण आढळले असून 89 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांची एकूण संख्या 5 लाख 15 हजार 803 झाली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजाराच्या खाली गेली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती.


सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजाराच्या खाली


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 3,614 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही सुमारे 22 महिन्यांतील सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद आहे. मागील काही दिवस देशात दररोज पाच हजारपेक्षा कमी कोरोना रुग्ण नोंदवली जात आहेत. यामध्ये असे दिसून येत की, दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या सलग 30 दिवस एक लाखाच्या खाली आहेत.


देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरु


देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीमही वेगाने सुरु आहे. देशात आतापर्यंत 179.13 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. जगभरात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. बहुतेक देशांमध्ये, कोरोना निर्बंध शिथी करण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे जगात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे जगभरातील मृत्यूची संख्या सोमवारी सहा दशलक्ष पार झाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha