Weather News : उत्तर भारतातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मैदानी राज्यांमध्ये उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी हंगामात वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या काही भागात किमान तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. होळीची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसी उष्णता वाढत आहे. त्यामुळं अजूनही काही राज्यांमध्ये थोडीशी थंडी जाणवत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा, हरभरा, द्राक्ष, केळी या पिकांसह आंबा, काजू, जांबू या पिकांनाही फटका बसला आहे.


दरम्यान, आज ढगाळ आकाशामुळे महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, नगर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.   


भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी उन्हाळी हंगामात वायव्य भारतातील अनेक भाग, ईशान्य भारतातील बहुतांश भाग, मध्य भारत आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भागात किमान तापमान सामान्य राहणार आहे. हिमालयाच्या पायथ्याशी तापमान सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये दक्षिण द्वीपकल्पातील पूर्व, दक्षिण पूर्व आणि उत्तर-पश्चिमचा काही भाग वगळता भारताच्या बहुतेक भागांमध्ये किमान तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे.


दिल्ली


आज दिल्लीत कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


जम्मू आणि काश्मीर


जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून हवामानात बदल होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आता पुढील काही दिवस हवामान स्वच्छ राहणार आहे. दरम्यान, तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे. आता स्वच्छ हवामान आणि सूर्यप्रकाशामुळे थंडीपासून दिलासा मिळणार आहे. आज कमाल तापमान 29 अंश असेल तर किमान तापमान 16 अंश राहणार आहे. 


उत्तर प्रदेश


आज यूपीमध्ये तापमान सामान्य असेल, तर काही भागात आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. मात्र, यूपीच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजचे कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 17 अंशांवर असणार आहे.


राजस्थान


राजस्थानच्या काही भागात आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज तिथे कमाल तापमान 34 अंश, किमान तापमान 19 अंश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: