Coronavirus Cases Today in India : देशात आज कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1660 नवीन रुग्ण आढळले असून 4100 लोकांचा मृत्यू झाला आहे (या मृत्यूंमध्ये काही राज्यांमधील आधी नोंद न झालेल्या मृत्यूंचा समावेळ आहे). काल 1660 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 16 हजार 372 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 741 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशात 2 हजार 349 रुग्ण कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 741 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 20 हजार 855 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 80 हजार 436 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 182 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 182 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 29 लाख 7 हजार 749 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत 182 कोटी 87 लाख 68 हजार 476 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2 कोटी 24 लाख 5 हजार 227) प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IPL 2022 : आजपासून आयपीएल 2022 ची सुरुवात, 10 संघांत लढत, पहिल्या सामन्यात कोलकाता आणि चेन्नई आमनेसामने
- ISRO New Launch : ISRO लवकरच लाँच करणार चांद्रयान-3, यावेळी नक्कीच यश मिळणार : डॉ. सिवन यांना विश्वास
- Anil Ambani : अनिल अंबानींचा मोठा निर्णय, आर-पॉवर आणि आर-इन्फ्रा संचालक पदाचा राजीनामा
- Petrol Diesel Price Hike : इंधन दरात मागील 5 दिवसातील चौथी वाढ, पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha