Anil Ambani Resign : अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर (R-Power) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या (R-Infra) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) ने अनिल अंबानी यांना स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये सामील होण्यास बंदी घातली होती.


सेबीच्या आदेशानंतर संचालक पदाचा राजीनामा 
रिलायन्स पॉवरने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सेबीच्या अंतरिम आदेशानंतर गैर-कार्यकारी संचालक अनिल अंबानी कंपनीच्या संचालक पदावरून पायउतार झाले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, अनिल अंबानी यांनी सेबीच्या अंतरिम आदेशाचे पालन करून कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. सेबीने (SEBI) फेब्रुवारीमध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, उद्योगपती अनिल अंबानी आणि इतर तीन व्यक्तींवर कथितपणे पैशांची लाँड्रिंग केल्याबद्दल सिक्युरिटीज मार्केटमध्ये बंदी घातली होती.


पाच वर्षांसाठी अतिरिक्त संचालकाची नियुक्ती
आर-पॉवर आणि आर-इन्फ्राच्या संचालक मंडळाने शुक्रवारी राहुल सरीन यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी स्वतंत्र संचालक म्हणून अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली, असे दोन्ही ADAG समूह कंपन्यांनी सांगितले. मात्र, ही नियुक्ती सध्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha