Coronavirus Cases Today in India : सध्या दिवसागणिक कोरोनाचा आलेख घसरताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 1574 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 0.95 टक्के आहे. काल 2 हजार 208 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते आणि 12 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजे एका दिवसात 634 रुग्णांची घट झाली आहे. ही दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या कमी होणाऱ्या प्रादुर्भावामुळे सणांवरचे निर्बंध हटले आहेत. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधातून मुक्त होत उत्साहात सण साजरे केले जात आहेत.


देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट


एकीकडे देशातील नवीन रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळते. तर दुसरीकडे देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. देशात सध्या 18 हजार 802 सक्रिय रुग्ण आहेत. काल ही संख्या 20 हजार 821 इतकी होती. देशात नव्याने 19 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब अशी आहे की, देशात दोन हजारहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2 हजार161  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 






गेल्या 7 दिवसांत हजार नवीन रुग्ण


गेल्या सात दिवसात देशात नऊ हजार 914 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत देशात एकूण 4 कोटी 46 लाख 50 हजार 662 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात आतापर्यंत 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.77 टक्के आहे. तर देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.04 टक्के आहे.






 


गेल्या सात दिवसांतील आकडेवारी


29 ऑक्टोबर 2022 : 1574
28 ऑक्टोबर 2022 : 2208
27 ऑक्टोबर 2022 : 1112
26 ऑक्टोबर 2022 : 830
25 ऑक्टोबर 2022 : 862
24 ऑक्टोबर 2022 : 1334
23 ऑक्टोबर 2022 : 1994