महाराष्ट्रात काल 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 37390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 82968 इतका झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात 2969 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात रिकव्हरी रेट 48.20 टक्के
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.20 टक्के आहे. आयसीएमआरने कोरोना टेस्टिंगची क्षमता वाढवली आहे. यासाठी 520 सरकारी प्रयोगशाळा तर 222 खाजगी अशा742 प्रयोगशाळा सुरू आहेत. आतापर्यंत देशात 45 लाख 24 हजार 317 इतक्या टेस्ट झाल्या आहेत.
मागील आठ दिवसात देशात रोज 8 हजारांहून अधिक रुग्ण
- 31 मे- 8380,
- 1 जून - 8392,
- 2 जून - 8171,
- 3 जून - 8909,
- 4 जून - 9304,
- 5 जून - 9851,
- 6 जून - 9887,
- 7 जून - 9971
मागील आठ दिवसात देशात 1958 रुग्णांचा मृत्यू
- 31 मे- 193
- 1 जून - 230
- 2 जून - 204
- 3 जून - 217
- 4 जून - 260
- 5 जून - 273
- 6 जून - 294
- 7 जून - 287
महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य
तामिळनाडू 30152 रुग्ण, 16395 बरे झाले, मृतांचा आकडा 251
दिल्ली 27654 रुग्ण, 10664 बरे झाले, मृतांचा आकडा 761
गुजरात 19592 रुग्ण, 13316 बरे झाले, मृतांचा आकडा 1219
राजस्थान 10331 रुग्ण, 7501 बरे झाले, मृतांचा आकडा 231
मध्यप्रदेश 9228 रुग्ण, 6108 बरे झाले, मृतांचा आकडा 309
उत्तरप्रदेश 9733 रुग्ण, 5648 बरे झाले, मृतांचा आकडा 11
पश्चिम बंगाल 7738 रुग्ण, 3119 बरे झाले , मृतांचा आकडा 383