Corona Virus Updates : जागतिक स्तरावर कोरोनाच्या (Corona Cases Updates) वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिल्यानंतर ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड नियमांचे पालन करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित केल्या आहेत.
केंद्राकडून आलेली नियमावली पाळण्याच्या सूचना देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. इन्फ्ल्यूएन्झा आणि सारीच्या गंभीर केसेसची देखील कोव्हिड चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचणी किट मुबलक प्रमाणात मुबलक आहेत की नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या सचिवांना देखील हे पत्र मिळालं असून आता सणासुदीच्या दिवसांत सतर्क राहण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य खात्याकडून करण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याकडून या सूचना देशातील सर्व राज्यांना दिल्या आहेत. पॉझिटिव्ह सॅम्पल्स जिनोम सिक्वेन्सिंगकरीता पाठवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे नवा व्हेरीयंट असल्याचं सतर्क होता येईल, असं पत्रात म्हटलं.
रुग्णालयात बेड्स अव्हेबिलिटी, लॉजिस्टिक्स आणि कर्मचारी वर्ग मुबलक आहे की नाही याची खबरदारी घ्या, कर्मचाऱ्यांचे ड्राय रन घेण्याच्या देखील सूचना केंद्रीय आरोग्य खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
बूस्टर डोसची टक्केवारी वाढवण्याच्या सूचना
लसीकरण करुन घेण्याचं तसेच बूस्टर डोसची टक्केवारी वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बाजारात गर्दी न व्हावी याकरीता बाजारातील संघटना, बिजनेस ओनर्स आणि इव्हेंट आॅर्गनायझर्सनं खबरदारी घेण्याच्या सूचना, गर्दी असल्यासही इनडोअरमध्ये मास्क घालत कोव्हिड नियमांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांना आवाहन करत कोव्हिड नियमांचे पालन व्हावे याचीही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्याही सूचना
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी देखील आजच्या बैठकीत त्यांनी कोरोनासंबंधीत ताजी स्थिती काय, तसेच राज्यांची त्यासंदर्भात तयारी काय आहे याचा आढावा घेतला. जगभरात कोरोनाच्या वाढत्या धोक्याचा पार्श्वभूमीवर भारतामध्ये सतर्कतेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्यात, रुग्णांचा फॉलोअप घ्यावा, त्यांच्यावर योग्य उपचार करावेत आणि लसीकरणावर भर द्यावा असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना दिले आहेत. राज्यानी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेसंबंधित सर्व व्यवस्थापन करावं आणि आरोग्य व्यवस्थेला सतर्क करावे असेही निर्देश त्यांनी दिले.
ही बातमी देखील वाचा