नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जग कोरोनावरील प्रभावी लसीकडे डोळे लावून बसलं आहे. अनेक देशांत लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. अशातच भारतात मात्र, कोरोना लसीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. CDSCO म्हणजेच, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनायझेशनच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि फायझर यांच्या कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यासाठी त्यांच्या डेटाचं पुनरावलोकन केलं. बैठकीत या कंपन्यांकडून आणखी काही डेटा मागवण्यात आला आहे. त्यामुळे सर्व डेटा आणि बाबींची शहानिशा केल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.


सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनायझेशनची सब्जेक्ट एक्सपर्ट कमिती सर्व डेटाचं पुनरावलोकन केल्यानंतरच आपली शिफारस डीसीजीआय म्हणजेच, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे करणार आहे. या शिफारसीनंतर डीसीजीआय कोणत्या लसीला परवानदी द्यायची यासंदर्भात निर्णय घेणार आहे. बुधावारच्या बैठकीत या तीन कंपन्यांकडे आपत्कालीन वापराच्या परवानगीचा निर्णय घेण्यासाठी आणि सुरक्षा, इम्युनोजेनिसिटी आणि एफीकेसीसंदर्भात आणखी काही डेटा मागवण्यात आला आहे. डेटा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा एक्सपर्ट पॅनलची बैठक घेण्यात येणार आहे.


बुधवारी पार पडलेल्या बैठकीत फायझर कंपनीने आपल्या डेटासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी त्यांना आणखी काही कालावधी लागणार असल्याचं त्यांनी लिखित स्वरुपात दिलं आहे. त्यामुळे सब्जेक्ट एक्सपर्ट पॅनलने त्यांना त्यासाठी आणखी काही वेळ दिला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने सुरक्षेचा डेटा एकत्र केला होता, परंतु, तो केवळ 14 नोव्हेंबर पर्यंतचा होता.


1. क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील अपडेटेड डेटा
2. ब्रिटन आणि भारतात करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलचा इम्यूनोजेनिसिटी डेटा.
3. ब्रिटनच्या रेग्युलेटरकडे इमरजन्सी यूज ऑथरायझेशनसाठी परवानगीची माहिती


तसेच भारत बायोटेककडेही आणखी काही माहिती मागवली आहे. आता सुरु असलेल्या क्लिनिकल ट्रायल एफीकेसी आणि सेफ्टी डेटा कमिटीसमोर सादर करण्यास भारत बायोटेकला सांगण्यात आलं आहे.


सब्जेक्ट एक्सपर्ट पॅनलच्या वॅक्सिनच्या आपत्कालीन वापराच्या मंजूरीसाठी आणखी एक बैठक घेण्यात येणार आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट पॅनल मंजूरी देऊ शकत नाही, तसेच ते कोणत्याही लसीला नामंजूरीही देऊ शकत नाही. ते सर्व डेटाचं पुनवरालोकन करुन आपले निष्कर्श डीसीजीआयकडे पाठवतात. त्याच्या आधारावर लायसेंस देण्याचा निर्णय घेतला जातो. सध्या ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. जेव्हा तीनही कंपन्या मागण्यात आलेला आपला डेटा सादर करतील त्यानंतरच यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे भारतात कोरोना वॅक्सिनसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :