नवी दिल्ली : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, सोमवार 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.
ब्रिटनकडून आणखी एका कोरोना लसीला मंजूरी, 70 लाख डोसची मागणी
कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार असेल तरीही सामान्य लोकांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाशी संबंधित केंद्राची योजना काय आहे यावर चर्चा करणार आहेत. या लसीकरणाच्या रोलआउट दरम्यान उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याचे निराकरण तसेच सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मच्या ऑपरेशनल क्षमतेची माहिती घेण्यासाठी नुकतंच नॅशनल ड्राय रनदेखील करण्यात आलं होतं.
Corona Vaccination | पहिल्या टप्प्यात 'या' तीन कोटी लोकांना कोरोना लस दिली जाणार, तपशील जाणून घ्या
भाजपचे देशव्यापी अभियान
सत्ताधारी भाजपचे नेते नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबतीत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासाठी देशव्यापी अभियान सुरु करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं होतं की, कोरोनाच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपतर्फे मोठ्या प्रमाणावर अभियान सुरु करण्यात येणार आहे. देशात कोरोनाच्या लसीची उपलब्धता करुन देणं हे सरकारचं मोठं यश आहे. पक्षाच्या या अभियानाच्या माध्यमातून कोरोनाच्या लसीविषयी लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या दूर केल्या जाणार आहेत. यामध्ये पक्षाचा प्रत्येक नेता सामील होणार आहे.
Corona Vaccine| पंतप्रधानांची 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
सर्वप्रथम तीन कोटी लोकांना लस देणार
कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार असेल तरीही सामान्य लोकांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यांच्यानंतर ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दिली जाईल. देशात लसीकरण सुरू होण्यापूर्वी सरकारने ड्राय रन म्हणजेच देशभरात दोनदा लसीकरणाचा सराव घेण्यात आला.