नवी दिल्ली : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याचा घोषणा केंद्र सरकारने केली आहे. लसीकरणासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान केले. यात कॅबिनेट सचिव व आरोग्य सचिवांखेरीज इतर अधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर लसीकरणाची प्रस्तावना जाहीर केली.


सर्वप्रथम तीन कोटी लोकांना लस देणार
कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार असेल तरीही सामान्य लोकांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यांच्यानंतर ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दिली जाईल.


देशात लसीकरण सुरू होण्यापूर्वी सरकारने ड्राय रन म्हणजेच देशभरात दोनदा लसीकरणाचा सराव घेण्यात आला. शुक्रवारीही दुसर्‍या वेळी उत्तर प्रदेश वगळता देशातील प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन झाली.


CoronaVaccine Update: येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात


पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, परंतु त्याआधी लसीकरणाची तारीख जाहीर झाली आहे. या व्यतिरिक्त, लोकांमध्ये लसीसंबंधीची भीती दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवित आहे.


दोन लसींना आपात्कालीन स्थितीत वापरण्यास परवानगी


इंडिया बायोटेकची कोवॅक्सीन आणि ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोविशिल्ड लसीला 3 जानेवारीला आपत्कालीन वापरासाठी मंजूर झाली आहे. कोविशील्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली आहे.


कोविड लस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक


कोरोना लसीसाठी नाव नोंदणीसाठी फोटोसाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, डायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, सेवा ओळखपत्र (फोटोसह) केंद्र/राज्य सरकारद्वारे जारी केलेले पासपोर्ट, आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड, टपाल कार्यालय/बँकेने दिलेला पासबुक फोटो आणि कामगार मंत्रालयाच्या आरोग्य विमा स्मार्ट कार्डसह पेन्शन दस्तऐवज आवश्यक असेल. यापैकी कोणतीही कागदपत्रे असल्यास आपण कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यास सक्षम असाल. यासह 1075 वर टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे.


#BREAKING | 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार | ABP Majha