एक्स्प्लोर

Corona Vaccine : पुढच्या महिन्यात भारताला Pfizer ची लस मिळणार? मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Pfizer : रशियाच्या स्पुटनिक व्ही नंतर आता भारतात पुन्हा एक विदेशी लस येण्याच्या तयारीत आहे. फायझरच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी लसींचा तुटवडा असल्याने त्यात अनेक अडथळे येत असल्याचं दिसून येतंय. पण आता एक दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे. अमेरिकन लस निर्मिती कंपनी फायझरने या आधीच भारताकडे लसीच्या वापराला मंजुरी मिळावी अशी मागणी केली होती. आता ही मंजुरी अंतिम टप्प्यात असल्याचं समजतंय. ही मंजुरी मिळाली तर पुढच्याच महिन्यात फायझरची पहिली खेप भारतात येण्याची शक्यता आहे. 

भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर लसीकरणाच्या कार्यक्रमात करण्यात येत आहे. त्या नंतर रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या वापराला मंजुरी मिळाली. आता फायझरच्या वापराला मंजुरी मिळाली तर ती देशातील चौथी लस ठरणार आहे. सध्या फायझरच्या लसीचा वापर अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये करण्यात येत आहे. 

फायझर आणि मॉडर्ना या कंपनींनी त्यांच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी अशी विनंती  भारत सरकारकडे केली होती. आता फायझरच्या लसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून मॉडर्नासोबतही चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. 

भारत सरकारने सुरु केलेल्या कोरोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने 'ना नफा' या तत्वावर म्हणजे कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली होती. त्या संबंधी भारत सरकारशी चर्चा सुरू आहे अशी माहितीही कंपनीच्या वतीने त्यावेळी देण्यात आली होती. त्या अंतर्गत पाच कोटी लसीचे डोस देण्याची तयारी कंपनीने दर्शवली होती, पण त्यासाठी काही नियमांत भारत सरकारने सुट द्यावी अशी मागणी कंपनीच्या वतीनं करण्यात आली होती. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?

ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

Embed widget