नवी दिल्ली : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील  लॉकडाऊन संपायला एक दिवस बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन संपायच्या काही तास आधी म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. देशात लॉकडाऊन वाढवावं अशी जास्तीत जास्त राज्यांची मागणी आहे. कोरोनाचा वाढत असलेला प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवणे फायदेशीर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


दोन दिवसांपूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना संवाद साधला. त्यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांची लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना अमलात आणल्या जातील असं स्वत: पंतप्रधानांनी सांगितले आहे. परंतु लॉकडाउन वाढल्यास काही सवलती दिल्या जाऊ शकतात.


लॉकडाऊन 2.0 मध्ये काय सवलती दिल्या जाऊ शकतात?




  • सध्या देशात पिकांची काढणी सुरू आहे, त्यामुळे शेतकर्‍यांविषयी काही अटी शिथिल केल्या जाऊ शकतात. कारण लॉकडाऊनच्या काळात शेती बंद ठेवणे देशाचा परवडणारं नाही.

  • लॉकडाऊनदरम्यान विविध राज्यातील कामगार कामानिमित्त इतर राज्यांमध्ये अडकलेले आहेत. या कामगार किंवा गरीब लोकांना दिलासा दिला जाऊ शकतो.

  • कोरोना व्हायरसची सध्याची स्थिती पाहता शाळा-महाविद्यालये न उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

  • आरोग्य सेतू अ‍ॅपला ई-पास म्हणून वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

  • घरगुती वस्तू बनवण्याचे कारखाने आणि रस्ते बांधकाम कामांना काही अटींसह परवानगी दिली जाऊ शकते.

  • ज्या शहरांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे आढळलेली नाहीत, त्या राज्यांतील लॉकडाऊन उठवलं जाण्याची शक्यता आहे.

  • कोरोनाच्या संख्येनुसार देशाच्या वेगवेगळ्या भागांचं रेड, ऑरेंज, ग्रीन भागांत विभाजन केलं जाऊ शकतं.

  • झोननुसार ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, तिथलं जनजीवन अधिक सुरळीत होऊ शकतं.

  • शेतीची कामं, अन्नपुरवठा करणारी यंत्रणा यांना या लॉक डाऊनमधून पूर्णपणे सूट मिळू शकते.

  • जीवनावश्यक बाबींचं उत्पादन करणाऱ्या इंडस्ट्रीज सुरु करणं सरकारला आवश्यक आहे, त्यासाठी काही सामान्य निर्बंध लावून. या इंडस्ट्रीज सुरु ठेवल्या जातील.

  • देशात सार्वजनिक क्षेत्रातली अनेक बांधकामाची कामंही थांबून राहणं सरकारला परवडणारं नाही, त्यामुळे त्याबाबतही काही उपाय शोधले जातील.

  • रेल्वे, विमानसेवाही इतक्या पूर्णपणे सुरु होण्याची शक्यता नाही.


संबंधित बातम्या 

Coronavirus | WEB Exclusive | PPE Kit म्हणजे नेमकं काय? उत्तम क्वॉलिटीचे पीपीई कीट वापरणं का आवश्यक?