PM Narendra Modi Lockdown Address LIVE Updates | सध्याची स्थिती पाहता 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार : पंतप्रधान
देशात जीवघेणारा कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. आज देशातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.
पार्श्वभूमी
नवी दिल्ली : देशात जीवघेणा कोरोना व्हायरस फोफावत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. याच प्राश्वभूमीवर पंतप्रधान आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पीएमओने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
दोन आठवड्यांनी वाढू शकतो लॉकडाऊन
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करताना देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवू शकतात. असंदेखील सांगितलं जात आहे की, यंदा लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांना सुटही मिळू शकते.
मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी मंत्रालयातून काम करण्यास सुरुवात केली
अनेक केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी आपल्या कार्यालयांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त मंत्री आणि अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून देण्यात आलेल्या 'वर्क फ्रॉम होम'चं पालन करताना दिसत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नकवी, मंत्री किरेन रीजीजू, प्रह्लाद पटेल यांनीही सोमवारी आपल्या कार्यालयात हजेरी लावली.
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
मुंबईसह काही शहरात परिस्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याने महाराष्ट्रात तरी 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय घेतल्याचं यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केलं आहे. या कोरोना संकटातही महाराष्ट्र ठाम उभा राहून जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे. या संकटामध्ये सर्व राज्ये देशाच्या पाठीशी उभा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सर्व राज्यांना योग्य त्या सूचना देत आहेत. यात राजकारण आणू नये ही विनंती आहे. राजकारण आपण आयुष्यभर करत आलो. मात्र, राजकारण करण्याची ही वेळ नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
भारतातला कोरोना विषाणू वेगळा? 'या' राज्याने केली संशोधनाची मागणी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -