Constitution Day:   26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो.  


Constitution Day : आज संविधान दिन... का साजरा केला जातो हा दिवस? इतिहास आणि रंजक गोष्टी


हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आज देशभरात संविधान दिनाचा उत्साह आहे.  संविधान दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.   सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. या कार्यक्रमात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष संबोधित करणार आहेत. भाषणांनंतर राष्ट्रपती संविधानाची प्रस्तावना वाचन करतील. ज्याचं लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहे.  


असा असेल कार्यक्रम


1- सकाळी 10.55 वाजता राष्ट्रपती संसदेत पोहोचतील


2- सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत होईल.  


3- सकाळी 11.01 मिनिटांनी संसदीय कार्य मंत्री संबोधित करतील


4- सकाळी 11.05 वाजता लोकसभा अध्यक्ष संबोधित करतील


5- सकाळी 11.11 वाजता पंतप्रधान मोदी संबोधित करतील


6- सकाळी 11.26 वाजता उपराष्ट्रपतींचं संबोधन होईल 


7- सकाळी 11.41 वाजता राष्ट्रपती संविधान सभेतील चर्चेचं डिजिटल अवतरण तसेच 'संविधानिक लोकशाहीवर आधारीत ऑनलाइन प्रश्नोत्तरी' चं उद्घाटन करतील


8- सकाळी 11.50 वाजता राष्ट्रपतींचं संबोधन होईल


9- दुपारी 12.10 वाजता राष्ट्रपती संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करतील.