Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. काय म्हटलंय या पत्रात?


 


केंद्रीय गृहमंत्र्यांना काँग्रेसकडून पत्राद्वारे तक्रार
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाबाबत काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्राव्दारे केंद्रीय गृहमंत्र्यांना काँग्रेसकडून तक्रार करण्यात आला आहे. यानंतर जितके सेलिब्रेटी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले त्यांची आयबी कडून चौकशी होत असल्याचाही दावाही करण्यात येतोय. तसेच यापुढे पंजाब आणि जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील भागातून ही यात्रा जात असल्याने खबरदारी घेण्यासंदर्भात विनंती या पत्राव्दारे करण्यात आली आहे. 


 




2022/12/28/cda288cd9c7c1548e2136d356a2e6e371672213841512381_original.jpg" />


राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन
भारत जोडो यात्रेत कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत कॉंग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहण्यात आले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जी होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. 


 


वेणुगोपाल यांचे गृहमंत्र्यांना पत्र
काँग्रेसचे पवन खेडा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, राहुल गांधींना तुम्ही सहज ओळखू शकता, तर वेणुगोपाल यांनी त्यांच्या सुरक्षेसंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे खेडा यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता आम्ही संवेदनशील भाग असलेल्या पंजाब आणि काश्मीरमध्ये जाणार आहोत. भारत जोडो यात्रा हे यज्ञ, तपश्चर्या आहे. त्यात काही समाजकंटक अडथळा आणत आहेत. 


 


'भारत जोडो यात्रेमुळे भाजप अस्वस्थ" - मल्लिकार्जुन खर्गे
तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भारताच्या मूलभूत तत्त्वांवर सतत हल्ला होत आहे. संपूर्ण देशात द्वेषाची दरी खणली जात आहे. महागाई, बेरोजगारीने जनता हैराण आहे. पण सरकारला त्याची पर्वा नाही. खर्गे म्हणाले की, काँग्रेसला सर्वसमावेशक बनवायचे असेल तर युवक, महिला, विचारवंत यांचा समावेश करावा लागेल आणि त्याची सुरुवात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने झाली आहे. त्याने आमच्या प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ केले आहे.


संबंधित बातम्या


"हे लोक आधी माझ्या आजीला..."; 'पप्पू' म्हणून संबोधणाऱ्यांना राहुल गांधींचं सडेतोड उत्तर