Congress Leader Ghulam Nabi Azad Statement: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 300 जागा मिळतील अशी परिस्थिती नसल्याची स्पष्ट कबुली आझाद यांनी दिली. बुधवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमधील एका सभेला ते संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 


राज्यघटनेतील कलम 370 प्रभावहीन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. याबाबत असलेल्या मौनाचे आझाद यांनी समर्थन केले. त्यांनी म्हटले की, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे. केंद्र सरकारच कलम 370 पुन्हा लागू करते. भाजपच्या नेतृत्वातील सरकारने हे कलम 370 हटवले आहे. त्यामुळे ते पुन्हा हे लागू करणार नाहीत. मी तुम्हाला चुकीचे, खोटे आश्वासन देऊ शकत नाही. त्यामुळे त्याबाबत भाष्य करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 


गुलाम नबी आझाद म्हणाले, 'लोकांना खूश करण्यासाठी जे आपल्या हातात नाही, त्यावर मी बोलणार नाही. मी तुम्हाला खोटी आश्वासने देणार नाही. लोकसभेत 300 खासदार असल्याशिवाय राज्यघटनेतील कलम 370 ची अमलबजावणी करता येणे अशक्य आहे. लोकसभेत बहुमत असलेली सरकारचे हे काम करू शकते. आगामी 2024 च्या निवडणुकीत आमच्या पक्षाचे 300 खासदार विजयी होतील असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे कलम-370 बाबत कोणतेही आश्वासन देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 


 






तत्पूर्वी, जम्मू प्रांतातील किश्तवार जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आझाद यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आझाद यांनी कलम 370 बद्दल बोलणे व्यर्थ असल्याचे म्हटले होते. यावर आझाद म्हणाले की, 'प्रसारमाध्यमातील एका घटकाने काश्मीरमधील माझ्या भाषणाचे चुकीचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला. ५ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत आमची एकजूट असून एकच भूमिका आहे. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Cyclone Jovad : अस्मानी संकट! राज्याला 'जोवाड' चक्रिवादळाचा धोका; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान


ममता बॅनर्जी यांच्याकडून राष्ट्रगीताचा अपमान? भाजप नेत्याकडून पोलिसात तक्रार


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha