Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate : इंधन कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा आहे. भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात कोणतीही मोठी दरवाढ केली नाही. देशातील मुंबईसह इतर चार महानगरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर आहेत. मागील काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. ही घसरण कायम राहिल्यास इंधन दरात आणखी कपात होऊ शकते असे म्हटले जाते. मागील काही दिवसांपासून इंधन दर स्थिर आहेत. 


मुंबईत पेट्रोलचे (Petrol-Diesel Price In Mumbai)पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. डिझेलचा दर 94.14 इतका आहे. चेन्नईमध्ये 101.40 रुपये प्रति लिटर, राजधानी दिल्लीत 103.97 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये 104.67 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. तर, दिल्लीत डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लिटर असे असून चेन्नईत 91.43 रुपये, कोलकातामध्ये 89.79 रुपये प्रति लिटर इतका आहे. 


पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.32 इतका आहे. पुण्यात पेट्रोल दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 77 पैशांनी वाढ झाली असून 93.08 रुपये प्रति लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल दरात 37 पैशांनी घट झाली असून नवीन दर 112.27 रुपये इतका झाला आहे. डिझेलच्या दरात 1 रुपया 79 पैशांनी घट झाली आहे. औरंगाबादमध्ये डिझेलचे दर 94 रुपये प्रति लिटर इतके आहेत. 


नागपूरमध्ये पेट्रोलच्या दरात 38 पैशांनी घट झाली आहे. नागपूरमध्ये आता पेट्रोल दर 109.71 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर, डिझेलच्या दरात 36 पैशांनी घट झाली आहे. डिझेलची किंमत 92.53 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. 


दरम्यान, पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क सध्या 27. 90 रुपये इतकं आहे. तर, डिझेलवर 21.80 रुपये आहे. राज्यात केवळ मूळ उत्पादन शुल्कातून वाटा मिळण्याचा अधिकार आहे. कर आकारणीच्या एकूण बाबींपैकी पेट्रोलवरील मूळ उत्पादन शुल्क 1.40 रुपये प्रति लीटर आहे. याचबरोबर विशेष अतिरिक्त उत्पादक शुल्कात 11 रुपये आणि रस्ता तसेच पायभूत सुविधेवरील उपकर 13 रुपये प्रति लीटर आकारला जातो. कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर 2.50 रुपये आकारला जातो. त्याचप्रमाणे, डिझेलवरील मूळ उत्पादन शुल्क 1.80 रुपये प्रति लीटर आहे. विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकर म्हणून प्रति लिटर 8 रुपये आकारला जातो. तर, 4 रुपये प्रति लिटर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर देखील आकारला जातो.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Petrol Diesel Price Excise Duty: पेट्रोल- डिझेलवरील उत्पादन शुल्कामुळं सरकारच्या उत्पन्नात दुप्पट वाढ


Petrol Price : अरविंद केजरीवालांचा धमाका, पेट्रोल दरात थेट 8 रुपयांची कपात