Police Complaint Against Mamata Banerjee :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांचा हा मुंबई दौरा राजकीय कारणांमुळे चर्चेत असताना आता आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुंबई भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी ममता यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याशिवाय, त्यांनी मुंबईतील लेखक, पत्रकार, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट संवाद साधला होता. या दरम्यान ममता यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई भाजपचे नेते विवेकानंद गुप्ता यांच्यानंतर आमदार अतुल भातखळकर हे देखील ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार करण्याची शक्यता आहे. 






नेमकं काय झालं?


ममता बॅनर्जी यांनी 'सिव्हील सोसायटी'च्या भेटीत संवाद साधत असताना त्यांच्या राष्ट्रगीताच्या काही ओळी खुर्चीवर बसून म्हटल्या. त्याशिवाय त्यांनी पूर्णपणे राष्ट्रगीताच्या ओळी म्हटल्या नाहीत असा आरोप भाजपने केला आहे. ममता बॅनर्जी यांची ही कृती राष्ट्रगीताचा अपमान करणारी असल्याचे भाजपने म्हटले आहे. 


कुठं आहे यूपीए?


काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही असं वक्तव्य तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीनंतर हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि शरद पवार एकत्र येऊन आघाडी स्थापन करणार आणि काँग्रेसला 'कात्रजचा घाट' दाखवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


भाजपविरोधी लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे; नाना पटोलेंचे ममता बँनर्जींना उत्तर


Mamata Banergee : काँग्रेसला वगळून आघाडी करणार, जे लढतील त्यांना सोबत घेणार; ममता बॅनर्जींचे संकेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha