नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्नातून विषबाधा झाल्याची शंका आल्यानंतर त्यांना रविवारी सायंकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात भरती करण्यात आलं.
दरम्यान सोनिया गांधींची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर आल्यानंतर रुग्णालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
यापूर्वीही फेब्रुवारीमध्ये सोनिया गांधींना श्वसनाच्या त्रासानंतर याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एक दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.