एक्स्प्लोर

राहुल गांधींच्या पत्रकारावरील टिपण्णीनंतर काँग्रेस-भाजपचा 'व्हिडिओवॉर'

तुम्ही पंतप्रधानांची मुलाखत पाहिलीत का? म्हणजे प्लाएबल (Pliable) पत्रकार. त्या प्रश्नही विचारत होत्या आणि उत्तरंही देत होत्या' अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केल्यानंतर भाजपने व्हिडिओ वॉर छेडला

नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत बाजारु असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केल्यानंतर 'व्हिडिओवॉर' रंगला आहे. लोकसभेत काँग्रेस-भाजपमध्ये राफेलवरुन सुरु असलेलं वाकयुद्ध, आता संसदेबाहेरही सुरु आहे. 'एनआय' वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी एक जानेवारी रोजी मोदींची प्रकट मुलाखत घेतली होती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत राफेल डीलच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. त्यावेळी बोलताना, 'त्यांच्यामध्ये (मोदी) तुम्हा पत्रकारांसमोर येऊन बसण्याची हिंमत नाही. पण मी आलो आहे. तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारु शकता. तुम्ही पंतप्रधानांची मुलाखत पाहिलीत का? म्हणजे प्लाएबल (Pliable) पत्रकार. त्या प्रश्नही विचारत होत्या आणि उत्तरंही देत होत्या' असं राहुल गांधी म्हणाले. प्लाएबल हा शब्द नेहमीच्या वापरातील नसल्यामुळे अनेकांना गूगलचा आधार घ्यावा लागला. त्याचा शब्दशः अर्थ सहज कोणाच्याही प्रभावाखाली येणारा असा येतो. राहुल गांधींचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर राहुल गांधींनी उच्चारलेला #Pliable हा शब्द ट्रेण्डिंगमध्ये आला. 'द एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया' अर्थात भारतातील वरिष्ठ संपादकांच्या मंडळाने याविषयी काळजी व्यक्त केली आहे. पत्रकार किंवा प्रसारमाध्यमांना टार्गेट करणं हा बदनामीचा सोपा मार्ग असल्याचं मत माध्यम क्षेत्रातून व्यक्त केलं जात आहे. 'आणीबाणीच्या हुकूमशाहाच्या नातवाने आपली खरी गुणसूत्रं (डीएनए) दाखवली. एका संपादकावर हल्ला चढवून घाबरवलं' अशा आशयाचं ट्वीट केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या मुलाखती एकत्र करुन त्यांचा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला. प्लाएबल हा आक्षेपार्ह शब्द नाही, ही भारतीय पत्रकारितेची सद्यस्थिती आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. भाजपच्या अमित मालवीय यांनी काही वेळातच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अखिलेश यादव यांच्या मुलाखतींचा भाग असलेला एक व्हिडिओ शेअर केला. ही टीका ज्यांच्यावर करण्यात आली, त्या एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनीही मौन सोडलं आहे. 'तुम्हाला पंतप्रधानांवर टीका करायची आहे, जरुर करा, ' राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा प्रेस क्लब ऑफ इंडियाकडूनही समाचार घेण्यात आला. 'आधी केंद्रीय मंत्र्याने वापरलेला प्रेस्टिट्यूट हा शब्द आणि त्यानंतर एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने मीडियाला प्लाएबल म्हणणं हे अनुचित आहे' असं पीसीआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
Abhijeet Dipke CJP : एकीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम
एकीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget